‘भारत-श्रीलंका डायव्हेक्स 2026’ सरावामध्ये सहभागी होण्यासाठी आयएनएस निरीक्षक कोलंबोत दाखल
नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.)। भारतीय नौदलाचे ''डायव्हिंग सपोर्ट आणि पाणबुडी बचाव जहाज'', आयएनएस निरीक्षक, 21 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या ‘आयएन-एसएलएन डायव्हेक्स 2026’ या द्विपक्षीय डायव्हिंग सरावाच्या चौथ्या आ
INS Nireekshak  Participate India-Sri Lanka DIVEX 2026 Exercise


INS Nireekshak  Participate India-Sri Lanka DIVEX 2026 Exercise


नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.)। भारतीय नौदलाचे 'डायव्हिंग सपोर्ट आणि पाणबुडी बचाव जहाज', आयएनएस निरीक्षक, 21 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीत श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या ‘आयएन-एसएलएन डायव्हेक्स 2026’ या द्विपक्षीय डायव्हिंग सरावाच्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी, 21 एप्रिल 2026 रोजी कोलंबो बंदरात दाखल झाले.

या संयुक्त सरावात दोन्ही देशांच्या नौदलांची डायव्हिंग पथके विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण मालिकेत सहभागी होतील. दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि एकता वाढवणे, तसेच सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणे, हे या सरावांचे उद्दिष्ट आहे. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमामुळे, भारत-श्रीलंका सागरी संबंध आणि सामायिक सागरी हित अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल.

आगमन झाल्यावर श्रीलंकेच्या नौदलाने नौदल बँडच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या जहाजाचे समारंभपूर्वक स्वागत केले. आयएनएस 'निरीक्षक'चे कमांडिंग ऑफिसर, कमांडर शैलेश त्यागी यांनी पश्चिम नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रिअर ॲडमिरल एस.जे. कुमारा यांची भेट घेतली आणि परस्पर हिताच्या बाबींवर चर्चा केली. व्यावसायिक उपक्रमांव्यतिरिक्त, या भेटी दरम्यान सामाजिक संवाद, क्रीडा सामने आणि संयुक्त योग सत्रांचाही समावेश असेल. यामुळे दोन्ही नौदलांमधील मैत्री, सद्भावना आणि सौहार्दाचे संबंध अधिक दृढ होतील.

भारताच्या मानवतावादी उपक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारच्या ‘आरोग्य मैत्री’ उपक्रमांतर्गत हे जहाज श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना दोन बीएचआयएसएम (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता आणि मैत्री) क्यूब्स भेट देईल. या अत्याधुनिक पोर्टेबल वैद्यकीय युनिट्समध्ये तातडीने वैद्यकीय उपचार आवश्यक असलेले 200 रुग्ण हाताळण्याची क्षमता आहे. हे युनिट्स जलद प्रतिसाद देण्यासाठी डिझाइन केलेले असून, त्यामध्ये आवश्यक औषधे आणि मूलभूत शस्त्रक्रियांसाठी लागणारी सर्जिकल उपकरणे उपलब्ध आहेत. सागरी सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारतीय नौदल श्रीलंकेच्या नौदलाला 9 एमएम दारुगोळ्याच्या 50,000 राउंड्स देखील सुपूर्द करेल.

'आयएन-एसएलएन डायव्हिंग एक्सरसाइज' (आयएन-एसएलएन डायव्हेक्स) हा एक महत्त्वाचा द्विपक्षीय उपक्रम असून, तो भारत आणि श्रीलंका यांच्यातील खोलवर रुजलेल्या सागरी भागीदारीचा दाखला आहे. भागीदार राष्ट्रांबरोबर सातत्यपूर्ण सागरी सहकार्य आणि परस्परसंवाद, हा, महासागर (विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी द्विपक्षीय सर्वसमावेशक प्रगती) या दृष्टिकोनाला अनुसरून, हिंदी महासागर क्षेत्रातले स्थैर्य, सहकार्य आणि सामूहिक विकासाला चालना देण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande