
मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) - श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (एसएफएल) आपल्या विविध मुदतीच्या मुदत ठेव योजनांवरील (एफडी) व्याजदरात बदल केले असून हे सुधारित दर येत्या 6 मे २०२६ पासून लागू होणार आहेत.
एसएफएलच्या बँक कर्ज सुविधा, अपरिवर्तनीय डिबेंचर्स, सबऑर्डिनेटेड कर्जरोखे आणि मुदत ठेव योजनांच्या दीर्घकालीन कर्ज पतमापन दर्जामध्ये नुकतीच सुधारणा झाली आहे. क्रिसिल रेटिंग्स, आयसीआरए, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च आणि केअर रेटिंग्स या संस्थांनी विविध योजनांसाठीच्या दीर्घकालीन कर्ज पतमापन दर्जामध्ये आणखी सुधारणा करताना अलीकडेच एसएफएलला 'एएए(स्थिर)' असा सर्वोच्च पतमापन दर्जा बहाल केला आहे. सदर सुधारित पतमापन दर्जा प्रत्येक एजन्सीच्या स्तरावरील सर्वोच्च मानांकन आहे. पतमापन दर्जातील या सुधारणेमुळे कंपनीने व्याजदरात बदल केला आहे.
मुदत ठेवींना क्रिसिल रेटिंग्सकडून क्रिसिल AAA/स्टेबल, आयसीआरएकडून [आयसीआरए]AAA (स्टेबल), इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चकडून इंड AAA/स्टेबल आणि केअर रेटिंग्सकडून केअर AAA/स्टेबल असा पतमापन दर्जा देण्यात आला आहे.
मुदत सध्याचा व्याज दर प्रतिवर्ष सुधारित व्याज दर प्रतिवर्ष
15 महिने (डिजीटल स्वरुपात) 7.25% 7.05%
18 महिने – 23 महिने 7.15% 7.00%
24 महिने – 35 महिने 7.25% 7.05%
36 महिने – 60 महिने 7.60% 7.25%
खालीलप्रमाणे अतिरिक्त लाभ लागू राहतील
· ज्येष्ठ नागरिक (ठेव/नूतनीकरणाच्या वेळी वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक) वार्षिक ०.५०% अतिरिक्त व्याजासाठी पात्र आहेत.
· महिला ठेवीदारांना वार्षिक ०.०५% अतिरिक्त व्याज मिळेल.
· मुदत पूर्ण झालेल्या ठेवींच्या नूतनीकरणावर वार्षिक ०.१५% अतिरिक्त व्याज मिळेल.
ठेवी १,०००/- रुपयांच्या पटीत स्वीकारल्या जातील, ज्याची किमान रक्कम ५,०००/- रुपये असेल.
मुदत गुंतवणूक योजना (एफआयपी) — सुधारित दर (दिनांक ६ मे २०२६ पासून लागू)
मुदत सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष सुधारित व्याजदर प्रतिवर्ष
12 – 23 महिने 7.00% 6.75%
24 – 35 महिने 7.25% 7.05%
36 – 48 महिने 7.60% 7.25%
खालीलप्रमाणे अतिरिक्त लाभ लागू राहतील:
· महिला ठेवीदारांना अतिरिक्त ०.०५% वार्षिक व्याज मिळेल.
· स्थिर गुंतवणूक योजनेच्या (एफआयपी) इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल होणार नाही.
एफआयपीचा हप्ता ५००/- रुपयांच्या पटीत स्वीकारला जाईल, ज्याची किमान रक्कम १,०००/- रुपये असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी