
नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)। नाशिक विभागातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडू यांना विविध खेळाची माहिती मिळावी, त्यांना खेळाचा सराव करण्यास संधी मिळावी, खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने दि.१८एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नाशिकच्या दिंडोरी रोड येथील तारवाला नगरजवळील तलाठी कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज चौक चौकातील जिजामाता क्रीडा संकुल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तलवारबाजी, सेपक टकरा, जम्प रोप, फुटबॉल आणि फूटसाल, लॅक्रोस, कॅरम या खेळांचा समावेश आहे. २७२ खेळाडूंनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आहे.
या शिबिराचे औपचारिक उद्घाटनमाजी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बनकर , जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मॉडर्नपेंटेथलॉन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त शोक दुधारे, आनंद खरे, ओझर नगर परिषदेचे नगरसेवक अशोक कदम, बॅडमिंटनचे आंतरराष्ट्रीय खेळाडूमिलिंद पूर्णपात्रे, परिसरातील सामाजीक कार्यकर्ते पीयूष लामखेडे, तलवारबाजी राज्य प्रशिक्षक अजिंक्य दुधारे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले की शासनाच्या बरोबरीने क्रीडा संस्थांचे योगदान असल्यास खेळाडूंच्या गुणवत्तेत वाढ होते. स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचा या उपक्रमाचा खेळाडूंनी फायदा घेऊन प्रगती करावी असे सांगितले. या शिबीरामध्ये या विविध खेळांचे तज्ञ प्रशिक्षक मार्गर्दर्शन करत आहेत. शिबीर यशस्वीतेसाठी कुणाल अहिरे, अविनाश वाघ, सतीश बोरा, ज्योती निकम, प्रसाद परदेशी, ऋषिकेश रसाळ, प्रयत्नशील आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV