रायगड - दाखणे बौद्धवाडीत महिलेला मारहाण; फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी, तिघांवर गुन्हा
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : माणगाव तालुक्यातील दाखणे बौद्धवाडी येथे किरकोळ वादातून महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घर
Woman beaten up in Dakhane Bouddhavadi; seriously injured due to fractures, three charged


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : माणगाव तालुक्यातील दाखणे बौद्धवाडी येथे किरकोळ वादातून महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घराच्या अंगणात उभी असताना आरोपी क्रमांक १, २ व ३ या तिच्या मोठ्या मुलीविरोधात अपशब्द वापरत चर्चा करत होत्या. याबाबत जाब विचारल्याने आरोपींना संताप आला. त्यानंतर त्यांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण केली.

दरम्यान, आरोपी क्रमांक १ ने फिर्यादीचा हात पिळून तिला शेजारील काँक्रीटच्या टाकीवर ढकलले.

या घटनेत तिच्या कमरेला तसेच उजव्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर होऊन ती गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भा.न्या.सं. कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande