इंधन संकटामुळे युरोपमधील एअरलाईन कंपनी लुफ्थांसाची २० हजार उड्डाणे रद्द
ब्रुसेल्स, 22 एप्रिल (हिं.स.)। युरोपमधील मोठी एअरलाईन कंपनी लुफ्थांसा एजी ने आपल्या उन्हाळी वेळापत्रकातून २०,००० लघुपल्ल्याच्या उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जेट इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे हे पाऊल उचलले आहे. इराण यु
इंधन संकटामुळे युरोपमधील एअरलाईन कंपनी लुफ्थांसाचे २० हजार उड्डाणे रद्द


ब्रुसेल्स, 22 एप्रिल (हिं.स.)। युरोपमधील मोठी एअरलाईन कंपनी लुफ्थांसा एजी ने आपल्या उन्हाळी वेळापत्रकातून २०,००० लघुपल्ल्याच्या उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जेट इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे हे पाऊल उचलले आहे. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर जेट इंधनाच्या किमती दुप्पट झाल्या आहेत.कंपनीच्या माहितीनुसार, या उड्डाण कपातीमुळे एकूण उपलब्ध आसन क्षमतेत सुमारे १ टक्क्यांनी घट होईल आणि जवळपास ४०,००० टन जेट इंधनाची बचत होईल.

यापूर्वी लुफ्थांसा ने आपल्या प्रादेशिक युनिट सिटीलाइन बंद करण्याची तसेच अधिक इंधन खर्च करणारी २७ जुनी विमाने सेवेतून हटवण्याची घोषणा केली होती. मंगळवारपासून १२० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, आणि हा निर्णय मे महिन्याच्या अखेरपर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय संपूर्ण उन्हाळी हंगामासाठी आणखी कपातीची घोषणा एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला केली जाणार आहे.

जागतिक स्तरावरही विमान वाहतूक उद्योगावर याचा परिणाम झाला आहे. डेटा अॅनालिटिक्स कंपनी सिरियम लिमिटेड यांच्या माहितीनुसार, मे महिन्यात एकूण उड्डाण क्षमतेत सुमारे ३ टक्क्यांनी घट झाली आहे आणि जगातील जवळपास सर्व मोठ्या एअरलाईन्सनी आपल्या उड्डाणांमध्ये कपात केली आहे. यापूर्वी यावर्षी ४ ते ६ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र आता काही परिस्थितींमध्ये ३ टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लुफ्थांसा आपला नफा वाढवण्यासाठी खर्च कमी करण्यावरही काम करत आहे. कंपनीने २०३० पर्यंत ४,००० प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची योजना आखली आहे. याशिवाय लघुपल्ल्याची उड्डाणे कमी खर्चाच्या युनिट्सकडे, जसे सिटी एअरलाईन्स आणि डिस्कव्हर, सोपवण्याची तयारी सुरू आहे. या युनिट्समध्ये कर्मचाऱ्यांवरील खर्च मुख्य एअरलाईनच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांनी कमी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande