बीड - पोखरीघाट येथे ४२ कुस्त्यांचा फड रंगला; ७ लाख ६५ हजारांची बक्षीसे
बीड, 26 एप्रिल, (हिं.स.)। बीड तालुक्यातील पोखरीघाट येथे अखंड हरिनाम महोत्सवानिमित्तच्या कुस्ती स्पर्धेत ४२ कुस्त्या लावण्यात आल्या. ग्रामस्थांच्या वर्गणीतून सात लाख ६५ हजारांचे रोख बक्षीस वाटप करण्यात आले. पैलवान माउली जामदाडे व हरयाणातील राष्ट्रीय
बीड - पोखरीघाट येथे ४२ कुस्त्यांचा फड रंगला; ७ लाख ६५ हजारांची बक्षीसे


बीड, 26 एप्रिल, (हिं.स.)। बीड तालुक्यातील पोखरीघाट येथे अखंड हरिनाम महोत्सवानिमित्तच्या कुस्ती स्पर्धेत ४२ कुस्त्या लावण्यात आल्या. ग्रामस्थांच्या वर्गणीतून सात लाख ६५ हजारांचे रोख बक्षीस वाटप करण्यात आले. पैलवान माउली जामदाडे व हरयाणातील राष्ट्रीय विजेता पैलवान रवींद्रकुमार यांच्यात कुस्तीचा जंगी सामना रंगला.

पोखरी घाट जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास क्षेत्र बेलेश्वर संस्थानचे महंत महादेव महाराज भारती, तुकाराम महाराज भारती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. पोखरी येथे भावार्थ रामायण व त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मारुती महाराज चोरमुले यांच्या कीर्तनाने सांगता झाली. पोखरीघाट येथील शेतकरी शेतमजूर ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारून शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध केली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande