'युजेनिक्स हेअर सायन्सेस'ची 'वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया'मध्ये नोंद
* एकाच केस प्रत्यारोपण प्रक्रियेत सर्वाधिक ग्राफ्ट्स प्रतिरोपित करण्याचा जागतिक विक्रम मुंबई, २७ एप्रिल (हिं.स.) : युजेनिक्स हेअर सायन्सेसने एकाच केस प्रत्यारोपण प्रक्रियेत सर्वाधिक ग्राफ्ट्स प्रतिरोपित करून जागतिक वैद्यकीय इतिहासात आपले नाव कोरल
युजेनिक्स हेअर सायन्सेस सुरेंद्र पाल सिंग


* एकाच केस प्रत्यारोपण प्रक्रियेत सर्वाधिक ग्राफ्ट्स प्रतिरोपित करण्याचा जागतिक विक्रम

मुंबई, २७ एप्रिल (हिं.स.) : युजेनिक्स हेअर सायन्सेसने एकाच केस प्रत्यारोपण प्रक्रियेत सर्वाधिक ग्राफ्ट्स प्रतिरोपित करून जागतिक वैद्यकीय इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी हा विक्रम केल्याबद्दल त्यांना अधिकृतपणे हा किताब प्रदान केला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक क्षणी, प्रतिनिधींनी या प्रक्रियेला मान्यता दिली आणि प्रगत केस पुनरुज्जीवनातील त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा सन्मान केला आहे व युजेनिक्स हेअर सायन्सेसला त्यांच्या प्रतिष्ठित नोंद संग्रहात समाविष्ट केले.

ही मिळालेली मान्यता युजेनिक्स हेअर सायन्सेससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कारण या ब्रँडने केवळ एक नवीन जागतिक मापदंडच स्थापित केला नाही, तर वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष मान्यताही मिळवली आहे. 'युजेनिक्स हेअर सायन्सेस'च्या मुंबई येथील क्लिनिकमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते अधिकृत विक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

'शक्तीमान' आणि 'महाभारत'मधील नावाजलेल्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सुरेंद्र पाल सिंग यांच्या केस प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यांच्यावर २९ मे, २०२५ पासून केस प्रत्यारोपण प्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये दोन आठवड्यांच्या कालावधीत एकाच सिटिंगमध्ये एकूण ११,४२३ ग्राफ्ट्स प्रत्यारोपित करण्यात आले. अशा प्रकारच्या सर्वात किचकट प्रक्रियांपैकी एक हे प्रकरण आहे. हे प्रमाणपत्र क्लिनिकची अचूकता, नाविन्य आणि व्याप्ती यांना मान्यता देते. ज्यामुळे भारतातील केस प्रत्यारोपण करण्यात कुशलतेमध्ये त्यांचे अग्रणी स्थान अधिक मजबूत होते आणि जगातील सर्वात उल्लेखनीय कामगिरी करण्यात त्यांचा समावेश होतो.

युजेनिक्स हेअर सायन्सेसचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष, डॉ. प्रदीप सेठी म्हणाले की, “हा महत्त्वाचा टप्पा आधुनिक केस पुनरुज्जीवनाच्या विज्ञानातील आणि त्याच्या विस्तारक्षमतेतील एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवतो. युजेनिक्समध्ये अचूक दाता व्यवस्थापन, सुधारित केस काढण्याचे तंत्र आणि सौंदर्यात्मक पुनर्रचनेची सखोल समज यांद्वारे जबाबदारीने वैद्यकीय कक्षा रुंदावण्यावर आम्ही नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. ही मान्यता आमच्या या विश्वासाला बळकटी देते की, भारत केवळ जागतिक वैद्यकीय नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होत नाही, तर अधिकाधिक स्वतःचे मापदंड प्रस्थापित करत आहे.”

युजेनिक्स हेअर सायन्सेसच्या सह-संस्थापक डॉ. अरिका बन्सल यांनी याबाबत पुढे सांगितले की “इतक्या मोठ्या प्रमाणावरील प्रक्रिया पार पाडण्यासाठी केवळ तांत्रिक क्षमताच नाही तर इतर अधिक गोष्टींची आवश्यकता असते, जसे की अत्यंत काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाच्या आरामावर काळजीपूर्वक लक्ष देणे फार गरजेचे असते. युजेनिक्समध्ये, आमचा दृष्टिकोन नेहमीच पूर्णपणे रुग्ण-केंद्रित राहिला आहे, ज्यामध्ये आम्ही दीर्घकालीन परिणाम, दाता क्षेत्राचे जतन आणि प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावरील सातत्य यांना सर्वोच्च प्राधान्य देत आलो आहोत.”

'वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया'चे वरिष्ठ परीक्षक लक्ष दीप मिश्रा यांनी पुढे सांगितले की वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये दिली जाणारी प्रत्येक मान्यता ही कठोर पडताळणी, अस्सलपणा आणि लक्षणीय उत्कृष्टतेवर आधारित असते. 'युजेनिक्स हेअर सायन्सेस'ने एकाच केस प्रत्यारोपण सत्रात ११,४२३ ग्राफ्ट्स (केसांचे मूळ घटक) यशस्वीरित्या प्रत्यारोपित करून जी कामगिरी केली आहे, ती आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील नैदानिक अचूकता, सातत्य आणि नाविन्याचा एक असाधारण आविष्कार म्हणून समोर येते.

या सविस्तर प्रकरणाच्या अभ्यासाची (केस स्टडीची) माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध : https://eugenixhairsciences.com/norwood-class-7/surendra-pal/

रुग्णाचे व्हिडिओ स्वरूपातील अभिप्राय (टेस्टीमोनिअल) येथे पाहता येतील : https://www.youtube.com/watch?v=lxSI8SOYhyU

'युजेनिक्स हेअर सायन्सेस'बद्दल

'युजेनिक्स हेअर सायन्सेस' हा भारतातील एक जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि अत्यंत विश्वासार्ह 'केस प्रत्यारोपण' ब्रँड आहे; जो आपल्या आधुनिक आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित उपायांसाठी ओळखला जातो. केस प्रत्यारोपण क्षेत्रात ३० हून अधिक वर्षांचा एकत्रित अनुभव असलेल्या आणि 'एआयआयएमएस'चे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी असलेल्या, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. प्रदीप सेठी आणि डॉ. अरिका बन्सल यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. 'युजेनिक्स' मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम नैपुण्य, नैतिक कार्यपद्धती आणि जागतिक दर्जाची मानके या सर्वांचा एकाच छताखाली सुरेख संगम साधण्यात आला आहे.

२०,००० हून अधिक यशस्वी प्रक्रिया आणि ५.५ कोटी ग्राफ्ट्सचे प्रत्यारोपण, तसेच केस विरळ होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते ग्रेड ६/७ च्या गंभीर टक्कल पडण्यापर्यंतच्या प्रकरणांवर उपचार करून युजेनिक्सने परिणाम, विश्वास आणि पारदर्शकता यावर आधारित आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. संस्थेचे सातत्यपूर्ण रुग्णांचे समाधान हे कठोर वैद्यकीय नियम, रुग्णाला प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन, वैयक्तिक उपचार योजना आणि सतत नवनवीन कल्पनांची पद्धत यामुळे टिकून आहे.

युजेनिक्स ही संस्था पुरुष आणि स्त्रिया या दोघांसाठीही प्रगत केस पुनरुज्जीवन सेवांची एक सर्वसमावेशक श्रेणी उपलब्ध करून देते. यामध्ये केस प्रत्यारोपण, हेअरलाइनची पुनर्रचना, दाढी व भुवयांची पुनर्स्थापना, सुधारणात्मक प्रक्रिया, तसेच 'अॅफ्रो' आणि शरीरावरील केसांचे प्रत्यारोपण यांसारख्या विशेष उपचारांचा समावेश आहे. या सर्व सेवांच्या बाबतीत, अत्याधुनिक सुविधा, अत्यंत प्रशिक्षित वैद्यकीय पथके आणि वैद्यकीय उत्कृष्टतेवर असलेला ठाम भर यांच्या माध्यमातून गुणवत्ता व सुरक्षिततेचे सर्वोच्च मापदंड सुनिश्चित केले जातात.

भारतातील आपले मुख्यालय आणि वेगाने वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्राहकवर्गासह, युजेनिक्स हेअर सायन्सेस आपल्या तांत्रिक क्षमतांमध्ये सातत्याने प्रगती करत वैद्यकीय कार्यक्षेत्राचा विस्तार करत आहे. या संस्थेने चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगातील प्रमुख व्यक्ती, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, संगीतकार आणि गायक यांच्यासह भारत आणि जगभरातील शेकडो रुग्णांची हेअरलाइन यशस्वीरित्या पुनर्संचयित केली आहे. युजेनिक्स हेअर सायन्सेस हे केस पुनर्संचयन उद्योगातील नैतिक वैद्यकीय पद्धतींचे एक खंदे समर्थक देखील राहिले आहे. हा ब्रँड त्याच्या पारदर्शक सल्ला प्रक्रियेसाठी, ग्राफ्टच्या अचूक अंदाजासाठी आणि वास्तववादी परिणाम निश्चितीसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जात आहे, ज्यामुळे जगभरातील रुग्णांमध्ये दीर्घकालीन विश्वास निर्माण होण्यास मदत झाली आहे. युजेनिक्समधील प्रत्येक प्रक्रिया अनुभवी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली आणि देखरेखीखाली केली जाते, ज्यामुळे उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर वैद्यकीय उत्तरदायित्व सुनिश्चित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande