
माद्रिद, २८ एप्रिल (हिं.स.)माद्रिद ओपन २०२६ मध्ये एक मोठा धक्कादायक निकाल लागला, ज्यात ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन एलेना रायबाकिना चौथ्या फेरीतच पराभूत झाली. दरम्यान, पुरुष गटात, जर्मन स्टार अलेक्झांडर झ्वेरेव्हने उत्कृष्ट कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश केला.
कझाकस्तानची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रायबाकिना, ५६ व्या क्रमांकावरील अनास्तासिया पोटापोव्हाकडून पराभूत होत स्पर्धेतून बाहेर पडली. रायबाव्हाने तिला ७-६ (१०-८), ६-४ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंनी दोनदा सर्व्हिस ब्रेक केली, त्यानंतर टाय-ब्रेकमध्ये पोटापोव्हाने विजय मिळवला.दुसऱ्या सेटमध्ये रायबाकिनाने आघाडी घेतली, पण पोटापोव्हाने जोरदार पुनरागमन करत आठवा आणि दहावा गेम ब्रेक करून सामना जिंकला. विजयानंतर पोतापोव्हाने सांगितले की, हा सामना तिच्यासाठी अत्यंत कठीण होता आणि तिच्या संघाच्या पाठिंब्यामुळे तिला विजय मिळवता आला.
दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने फ्रान्सच्या टेरेन्स एटमनला सरळ सेट्समध्ये ६-३, ७-६ (७-२) असे पराभूत करून पुरुष एकेरी स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. झ्वेरेव्हने पहिल्या सेटमध्ये दोनदा सर्व्हिस ब्रेक करून आघाडी घेतली, तर दुसरा सेट अटीतटीचा झाला, जो त्याने टाय-ब्रेकमध्ये जिंकला.याव्यतिरिक्त, युवा बेल्जियन टेनिसपटू अलेक्झांडर ब्लॉक्सने जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर असलेल्या कॅनेडियन टेनिसपटू फेलिक्स ऑगर-अलियासिमला ७-६ (७-३), ६-३ असे पराभूत करून एक मोठा उलटफेर घडवला. अव्वल १० खेळाडूंपैकी एकाविरुद्ध ब्लॉक्सचा हा पहिलाच विजय होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे