
मुंबई, 28 एप्रिल (हिं.स.)। सोनी मराठीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” आजच्या भागात आणखी रंगतदार होणार आहे. कारण आजच्या भागात पहिल्यांदाच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आहिराणी गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहे. तिच्या या खास परफॉर्मन्सची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या खास भागात नव्या आहिराणी गाण्याची टीमही उपस्थित राहणार आहे. यात कलाकार उत्कर्ष शिंदे, विनोद कुमावत, शीतल अहिरराव, तसेच गायक व संगीतकार समीर KS, गीतकार भैय्या मोरे आणि निर्माते गोकुळ पाटील यांचा समावेश आहे. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणारा हा भाग प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे.
प्राजक्ता माळीचा आहिराणी ठेक्यावरचा दमदार डान्स आणि हास्यजत्रेच्या कलाकारांची भन्नाट कॉमेडी यामुळे आजचा भाग नक्कीच पाहण्यासारखा आहे.
म्हणून पाहायला विसरू नका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” – आजच, फक्त सोनी मराठीवर आणि या खास मनोरंजनाचा आनंद घ्या!
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर