महाडात दागिन्यांच्या दुकानासह व्यावसायिक आस्थापनांमध्ये चोरीचा प्रयत्न
रायगड, 29 एप्रिल, (हिं.स.)। महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत तांबटआळी परिसरात अज्ञात चोरट्याने दागिन्यांच्या दुकानासह अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये चोरी व चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
Attempted-theft-at-commercial-


रायगड, 29 एप्रिल, (हिं.स.)। महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत तांबटआळी परिसरात अज्ञात चोरट्याने दागिन्यांच्या दुकानासह अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये चोरी व चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे महाड येथील ‘कौशल ज्वेलर्स’ या दुकानाचे लोखंडी शटर अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच परिसरातील ‘कृष्णा ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, चोरट्याला तेथे यश आले नसल्याचे समोर आले आहे. तसेच ‘सिटी प्राईड रेसीडेन्सी शॉप’मधील डिझाईन क्लासच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे १५ हजार रुपयांची रोख रक्कम, काही साड्या व भांडी चोरी करून नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुरनं. ३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 331(1), 331(4), 305 आणि 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गर्जे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande