खरातला आठव्या गुन्ह्यामध्ये अटक, गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याची एसआयटीची माहिती
नाशिक, 29 एप्रिल (हिं.स.)। :-नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून पुढील कारवाई वेगाने सुरू असून आरोपीविरोधातील गुन्ह्यांची स
Checks and engagement


नाशिक, 29 एप्रिल (हिं.स.)।

:-नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला सातव्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून पुढील कारवाई वेगाने सुरू असून आरोपीविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आठव्या गुन्ह्यातील तपासासाठी आरोपीचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयाकडून विशेष तपास पथकाला (एसआयटी) आवश्यक पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार आजच एसआयटीकडून अशोक खरात याला आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तपास यंत्रणेनुसार, अशोक खरात याच्याविरोधात विविध ठिकाणी फसवणूक व भोंदूगिरीचे प्रकार केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रत्येक नव्या तक्रारीनुसार त्याच्यावर स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात येत असून त्याचा तपास स्वतंत्रपणे केला जात आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत असून तपासासाठी वेगवेगळ्या कोनातून चौकशी सुरू आहे.

एसआयटीकडून आरोपीची सखोल चौकशी करून आणखी पीडितांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आरोपीने वापरलेल्या पद्धती, आर्थिक व्यवहार आणि इतर सहकारी यांचा शोध घेण्यावरही भर दिला जात आहे.

आठव्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर अशोक खरात याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर नागरिकांचे लक्ष लागले असून तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande