रत्नागिरी : लांज्यातील तरुणाची सोन्याचे बनावट दागिने देऊन फसवणूक
रत्नागिरी, 29 एप्रिल, (हिं. स.) : लांजा येथील कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या युवकाला सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने संगमेश्वर येथील बसस्थानकाजवळ बोलावून सोन्याचे बनावट दागिने देऊन साडेतीन लाखाची फसवणूक करण्यात आली. याबाबत संगमेश्वर पोलीस
रत्नागिरी : लांज्यातील तरुणाची सोन्याचे बनावट दागिने देऊन फसवणूक


रत्नागिरी, 29 एप्रिल, (हिं. स.) : लांजा येथील कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या युवकाला सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने संगमेश्वर येथील बसस्थानकाजवळ बोलावून सोन्याचे बनावट दागिने देऊन साडेतीन लाखाची फसवणूक करण्यात आली. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेश प्रकाश गुजर (रा. बेनी खुर्द गुजरवाडी, ता. लांजा) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेश प्रकाश गुजर गेल्या २० एप्रिल रोजी लांजा येथे यंग लूक कपड्याच्या दुकानात कामाला असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दुकानात येऊन आमच्याकडे काही सोने आहे. आमच्या गावाकडे लग्न आहे त्या आर्थिक अडचणीमुळे ते विकायचे आहे, असे सांगितले आणि त्यांच्याकडील जोंधळी मणी, सोन्याचे दागिने दाखवून त्यांच्याकडील त्याच्यासारखे असलेल्या जोंधळी मणी दागिन्यातील तारे गुंफलेले दोन-तीन मणी दिले. खात्री केली त्यानंतर साडेतीन लाख किमतीचे ते दागिने खरेदी करण्याचा व्यवहार झाल्याने दोन अज्ञात इसमांनी त्यासाठी संगमेश्वर एसटी स्टँड येथे येण्यास सांगितल्याने २८ एप्रिल रोजी जोंधळी मणी सोन्याच्या तारेत गुंतवलेल्या हारासारखे दागिने हे सोने खरे असे सांगत दागिने दिले. प्रत्यक्षात ते दागिने बनावट होते. त्यामुळे साडेतीन लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande