फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनोंकडून पंतप्रधान मोदींच्या फुटबॉल प्रेमाचे कौतुक
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.)फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिलाडूवृत्तीची आणि फुटबॉलवरील प्रेमाची प्रशंसा केली. त्यांनी सिक्कीममधील गंगटोक येथे मुलांसोबत फुटबॉल खेळणाऱ्या पंतप्रधान मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो  यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.)फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिलाडूवृत्तीची आणि फुटबॉलवरील प्रेमाची प्रशंसा केली. त्यांनी सिक्कीममधील गंगटोक येथे मुलांसोबत फुटबॉल खेळणाऱ्या पंतप्रधान मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इन्फँटिनो यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, नरेंद्र मोदींना आपला सुंदर खेळ खेळताना पाहून खूप आनंद झाला. फुटबॉल खरोखरच जगाला जोडतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सिक्कीमच्या दौऱ्यावर होते. आणि त्यांनी मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, सिक्कीममधील गंगटोक येथील एका सुंदर सकाळी माझ्या लहान मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखे दुसरे काही नाही! दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले, या तरुणांसोबतचे हे फुटबॉल सत्र खरोखरच उत्साहवर्धक होते.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉल हा एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे. सिक्कीम, मिझोराम, मणिपूर आणि मेघालय यांसारख्या राज्यांचे फुटबॉलमध्ये विशेष स्थान आहे. अनेक ठिकाणी त्याची लोकप्रियता क्रिकेटपेक्षाही जास्त मानली जाते. त्यामुळे, पंतप्रधान मोदींचा मुलांसोबत फुटबॉल खेळण्यातला सहभाग हा स्थानिक रहिवासी आणि क्रीडाप्रेमींसाठी एक विशेष संदेश म्हणून पाहिला जात आहे.

फिफा अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा करण्याची ही पहिली वेळ नाही. या दोन नेत्यांची अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भेट झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये अर्जेंटिना येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यानही त्यांची भेट झाली होती. त्यावेळी इन्फँटिनो यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या नावाचे फुटबॉल जर्सी भेट दिले होते. त्या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, अर्जेंटिनामध्ये येऊन फुटबॉलची आठवण न येणे अशक्य आहे. अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्याकडून ही जर्सी मिळाल्याने मला खूप आनंद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande