‘मुठभर माती’ आत्मचरित्र प्रेरणादायी व दिशादर्शक - प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी
परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)। शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत जनार्दन वाघमारे लिखित ‘मुठभर माती’ हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रेरणा देणारे व दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी
‘मुठभर माती’ आत्मचरित्र प्रेरणादायी व दिशादर्शक - प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी


परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।

शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत जनार्दन वाघमारे लिखित ‘मुठभर माती’ हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रेरणा देणारे व दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी- मराठी ग्रंथालय, सेलू यांच्या वतीने आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमाच्या 39 व्या पुष्पात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘मुठभर माती’ हे आत्मचरित्र मराठवाड्याचा सर्वांगीण पट मांडणारे असून त्यातून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जीवनाचे वास्तव चित्र उभे राहते. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीही शिक्षण व गुणवत्तेच्या जोरावर मोठी झेप घेऊ शकते, हा संदेश या आत्मचरित्रातून प्रभावीपणे मिळतो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. उत्तम राठोड होते. यावेळी स्व. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या दिलीप डासाळकर, प्रा. अनिल कुलकर्णी, रवि मुळावेकर, डॉ. दिगंबर घोडके, माधव गव्हाणे व गणेश माळवे यांचा ग्रंथालयाच्या वतीने अध्यक्ष प्रा. डॉ. उत्तम राठोड, मान्यवर महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर व हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande