बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात
मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.)। ''भारताची आंतरराष्ट्रीय बँक'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ कॉलद्वारे भारतीय सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्याची घोषणा आज केली. भारतीय बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच
बडोदा


मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.)। 'भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ कॉलद्वारे भारतीय सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्याची घोषणा आज केली. भारतीय बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, यामुळे श्रवण किंवा वाचा दोष असलेल्या ग्राहकांना बँकिंगविषयक मदत अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले ISL दुभाषी व्हिडीओ संवादाच्या माध्यमातून ग्राहकांना मदत करतील.

बँक ऑफ बडोदा वेबसाइट, बीओबी वर्ल्ड मोबाइल बँकिंग ॲप, व्हॉट्सॲप बँकिंग, फिजीटल शाखा आणि बँकेचा जेनएआय-सक्षम चॅटबॉट 'एडीआय', या पाच प्रमुख ग्राहक संपर्क केंद्रांवर ही सेवा उपलब्ध आहे. व्हिडीओ कॉल सुविधेची निवड करणारे ग्राहक 'व्हॉइससह व्हिडीओ कॉल' आणि 'सांकेतिक भाषेसह व्हिडीओ कॉल' यापैकी एक पर्याय निवडू शकतात. सांकेतिक भाषेचा पर्याय निवडल्यावर, मदतीसाठी तत्काळ कॉल एका प्रशिक्षित एजंटकडे वळवला जातो.

या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी, श्रवण किंवा वाणीदोष असलेल्या ग्राहकांना प्रभावीपणे सेवा देण्यासाठी बँकेने भारतीय सांकेतिक भाषेतील प्रशिक्षित ग्राहक सेवा प्रतिनिधींची भरती करण्याचा एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभावर भाष्य करताना, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देबदत्त चांद म्हणाले, आमच्या संपर्क केंद्राच्या कामकाजात भारतीय सांकेतिक भाषेचा समावेश करून, बँक ऑफ बडोदा सुलभ बँकिंग सेवा पुरवण्यातील एका महत्त्वपूर्ण उणिवेची पूर्तता करते आहे. या उपक्रमामुळे श्रवण किंवा वाचा दोष असलेल्या ग्राहकांना त्यांच्या बँकिंगविषयक गरजा स्वतंत्रपणे, सन्मानाने आणि सहजतेने हाताळणे शक्य होते; तसेच यातून बँकिंग क्षेत्रात एक नवीन आदर्श प्रस्थापित होत आहे. सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-आधारित आणि ग्राहक-केंद्रित बँकिंगप्रती असलेली आमची वचनबद्धता यातून अधिकच दृढ होते.

सांकेतिक भाषा सहाय्य सेवा सकाळी 09:00 ते सायंकाळी 06:00 या वेळेत उपलब्ध असेल. या सेवेमध्ये सर्व बिगर-वित्तीय बँकिंग सेवा, डिजिटल बँकिंग उत्पादने आणि सेवांबाबतचे सहाय्य, बँकिंगशी संबंधित सामान्य प्रश्न तसेच उत्पादनाविषयीच्या चौकशी व सेवा विनंत्यांसाठीचे सहाय्य यांचा समावेश असेल.

भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेच्या सुरुवातीमुळे बँकिंग सेवांची सुलभता वाढवण्याच्या बँकेच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळाली आहे. यामुळे श्रवण किंवा वाचा दोष असलेले ग्राहक आत्मविश्वासाने आणि कोणत्याही अडथळ्यांविना बँकिंग सेवांशी जोडले जातील.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande