
मुंबई, 30 एप्रिल, (हिं.स.)। भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या धनने 'गोल्ड व्हॉल्ट' सुरू
करण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच गुंतवणूक उत्पादन आहे, जे प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराला शेअर बाजारात थेट व्यवहार होणाऱ्या किमतींवर प्रत्यक्ष सोने आणि चांदी खरेदी करण्याची संधी देते.
धनचे हे गोल्ड व्हॉल्ट पूर्णपणे सेबीच्या भांडवली बाजार नियामक चौकटीत काम करेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना थेट
MCX-संबंधित किमतींवर प्रत्यक्ष सोने आणि चांदीची नाणी किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा एक नियमबद्ध मार्ग
मिळतो. सेटलमेंटची प्रत्यक्ष डिलिव्हरी MCXCCL द्वारे संस्थात्मक दर्जाच्या सुरक्षित व्हॉल्टिंगसह सुलभ केली जाते,
जेणेकरून गुंतवणूकदार आपली मौल्यवान मालमत्ता सुरक्षित साठवू शकतील.
पारंपरिकपणे, भारतात सोने खरेदी करताना योग्य किंमत, सुरक्षित मालकी, सोने किंवा चांदीची सत्यता आणि
नियामक चौकटीचा अभाव यांमध्ये तडजोड करावी लागत असे. मात्र, धनचे गोल्ड व्हॉल्ट मात्र हे सर्व मुळापासून
बदलून टाकते. किंमत निश्चिती थेट एक्सचेंजवर होते, प्रत्येक खरेदी ही पारदर्शकरित्या केली जाते आणि गुंतवणूकदार
थेट विनिमय दरांवर सोने किंवा चांदीच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यापार करण्याचा पर्याय निवडू शकतात आणि नंतर
या मौल्यवान मालमत्तेच्या प्रत्यक्ष वितरणाचा पर्याय निवडू शकतात. यामुळे विश्वास, शुद्धता आणि सुरक्षितता
एक्सचेंज तसेच नियामक चौकटीअंतर्गत एकत्र येतात.
वापरकर्त्याने खरेदी केलेला सोने किंवा चांदीचा प्रत्येक ग्रॅम, भारताचे विश्वसनीय कमोडिटी एक्सचेंज आणि
क्लिअरिंग कॉर्पोरेशन असलेल्या MCX / MCXCCL द्वारे सेटल केला जातो. कोणतेही मार्कअप, छुपे स्प्रेड किंवा
अनपेक्षित बदलांशिवाय किंमत थेट MCX एक्सचेंजवरून येते.
एकदा सोन्या-चांदीच्या करारांची प्रत्यक्ष पूर्तता झाली की, ती ग्राहकांच्या ComRIS खात्यांमार्फत, एक्सचेंजद्वारे
नियंत्रित, MCX-भागीदारी असलेल्या तिजोऱ्यांमध्ये सुपुर्द केली जातात आणि साठवली जातात. ह्या त्याच
संस्थात्मक दर्जाच्या सुविधा आहेत, ज्या मोठ्या वित्तीय कंपन्या पुरवतात आणि आता त्या पहिल्यांदाच किरकोळ
गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
भारतीय कुटुंबांसाठी सोने हे नेहमीच मूल्याचे सर्वात विश्वासार्ह भांडार राहिले आहे, अर्थात डिजिटल सोने प्रत्यक्ष
खरेदी करणे, ते बाळगणे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे नियामक कक्षेत येत नाही. गोल्ड व्हॉल्ट तयार करताना,
आम्ही एक साधा प्रश्न विचारला - एखाद्या गुंतवणूकदाराला डिजिटल पद्धतीने सोने किंवा चांदी खरेदी करताना
raiseholding.co | dhan.co
आणि ते बाळगताना सुरक्षित वाटण्यासाठी काय आवश्यक असेल? याचे उत्तर होते एक्सचेंज सेटलमेंट कॉन्ट्रॅक्ट्स,
नियमित व्हॉल्टिंग आणि शून्य काउंटरपार्टी जोखीम. आम्ही नेमके तेच तयार केले आहे. धनचे गोल्ड व्हॉल्ट हे असे
उत्पादन आहे जे भारतीय गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आवश्यक होते, आणि ते सर्वप्रथम सादर करताना आम्हाला
अभिमान वाटतो, असे धनचे संस्थापक आणि सीईओ प्रवीण जाधव म्हणाले.
“प्रत्यक्ष सोन्याच्या सेटलमेंटसाठी MCX ची पायाभूत सुविधा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. कोणत्याही रिटेल
प्लॅटफॉर्मने ते थेट वैयक्तिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवले नव्हते. पण धनच्या गोल्ड व्हॉल्टच्या माध्यमातून आम्ही हे
चित्र बदलले आहे. प्रत्येक खरेदी प्रत्यक्ष MCX फ्युचर्स सेटलमेंट आणि MCXCCL क्लिअरिंगद्वारे करून, आम्ही
भारतातील डिजिटल गोल्ड उत्पादनांना त्रास देणाऱ्या संरचनात्मक जोखमी दूर केल्या आहेत. किंमत एक्सचेंज-
बेंचमार्कवर आधारित आहे, डीलिव्हरी प्रत्यक्षपणे सेटल केली जाते आणि साठवणूक संस्थात्मकरित्या नियंत्रित आहे.
पहिल्यांदाच, एका रिटेल गुंतवणूकदाराला सोन्याची तीच चौकट मिळते, जी अनुभवी बाजार सहभागींना नेहमीच
उपलब्ध होती, असे 'धन'चे संस्थापक जय प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.
संपूर्ण भारतातील गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या
दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एक्स्चेंज-आधारित तरलता आणि किंमत निश्चितीची प्रक्रियेची नियमन-
नियंत्रित पायाभूत सुविधांशी सांगड घालून; गुंतवणूकदार आता पारदर्शक किंमत निर्धारण, व्यवहार पूर्तता, सुरक्षित
साठवणूक आणि अखंडित वितरणाच्या भक्कम आधारासह, 'फ्युचर्स'च्या माध्यमातून सोन्यामध्ये आत्मविश्वासाने
गुंतवणूक करू शकतात, असे MCX च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती प्रवीणा
राय यांनी सांगितले.
धनचे गोल्ड व्हॉल्ट आता धन ॲपवर सर्व धन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. गुंतवणूकदार थेट ॲपमध्येच याची
सुरुवात करू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर