चांदूरबाजार येथे पिकअप वाहनासह १६ लाखांचा गुटखा जप्त
अमरावती, 04 एप्रिल (हिं.स.) येथील पोलिसांनी अवैध गुटखा व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत पिकअप वाहनासह सुमारे १६ लाख रुपयांचा गुटखा जाम केला आहे. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पिकअप वाह
चांदूरबाजार येथे पिकअप वाहनासह १६ लाखांचा गुटखा जप्त


अमरावती, 04 एप्रिल (हिं.स.)

येथील पोलिसांनी अवैध गुटखा व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत पिकअप वाहनासह सुमारे १६ लाख रुपयांचा गुटखा जाम केला आहे. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे चांदूरबाजार पोलिसांनी सापळा रचून बाहन अडवले व त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, मस्तानी पुड्यांचा माल पिकअप वाहनात आढळून आला.कारवाईदरम्यान पोलिसांनी वाहन चालक मुजस शिरखान गैरखान (रा. पठाण चौक अमरावती) याला ताब्यात घेतले. जान करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे १६ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत आयपीएस अधिकारी सागर भामरे, पोलिस निरीक्षक अशोक जाधव, उल्हास राठोड, विनोद इंगळे, रुपेश श्रीवास तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक दीर्घकाळ कशी सुरू होती, याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande