इराणमध्ये पाडलेल्या F-15E जेटमधील अमेरिकन पायलटची सुरक्षित सुटका
वॉशिंग्टन , 05 एप्रिल (हिं.स.)।इराणने अमेरिकेचे एफ-15E स्ट्राइक ईगल लढाऊ विमान पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकन सैन्य अधिकाऱ्याची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. ही माहिती रविवारी ट्रम्प यांनी दिली आणि सांगितले की, अधिकारी जखमी झाले असले तरी त्
इराणमध्ये पाडलेल्या F-15E जेटमधील अमेरिकन पायलटची सुरक्षित सुटका


वॉशिंग्टन , 05 एप्रिल (हिं.स.)।इराणने अमेरिकेचे एफ-15E स्ट्राइक ईगल लढाऊ विमान पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकन सैन्य अधिकाऱ्याची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. ही माहिती रविवारी ट्रम्प यांनी दिली आणि सांगितले की, अधिकारी जखमी झाले असले तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. यापूर्वी या जेटमधील दुसऱ्या चालक दलातील सदस्याचीही सुरक्षित सुटका करण्यात आली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, “आम्ही त्यांना सुरक्षित बाहेर काढले! गेल्या काही तासांत अमेरिकन सैन्याने इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक यशस्वीपणे पूर्ण केली. आमचे उत्कृष्ट क्रू मेंबर अधिकारी, जे एक सन्माननीय कर्नल आहेत, आता पूर्णपणे सुरक्षित आहेत.”

ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने त्या अधिकाऱ्याच्या स्थानावर 24 तास नजर ठेवून त्यांच्या सुरक्षित सुटकेची योजना आखली होती. त्यांना वाचवण्यासाठी जगातील अत्याधुनिक आणि शक्तिशाली शस्त्रांनी सज्ज डझनभर विमाने पाठवण्यात आली होती. संबंधित अधिकारी जखमी झाले असले तरी ते पूर्णपणे बरे होतील, असेही त्यांनी म्हटले. तसेच, यामुळे इराणच्या आकाशावर अमेरिकेने पूर्ण हवाई वर्चस्व मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि या मोहिमेत एकही अमेरिकन जवान जखमी झाला नसल्याचे सांगितले.

दरम्यान, इराणने अमेरिकन विमानांसह नागरी ठिकाणांवरही हल्ले केल्याचे सांगितले जात आहे. इराणी प्रदेशात दुर्घटनाग्रस्त झालेले एफ-15E हे पहिले अमेरिकन विमान असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिका इराणला मोठा फटका दिल्याचा दावा करत युद्ध लवकरच संपेल, असे म्हटले होते. अमेरिका-इराण संघर्षादरम्यान A-10 हल्लेखोर प्रकारातील दुसरे अमेरिकन विमानही कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या कोहगिलुयेह आणि बायर अहमद प्रांतातील डोंगराळ भागात शोध आणि बचाव मोहीम राबवली.

इराणने या घटनेनंतर नागरिकांना माहिती देण्यासाठी बक्षीस जाहीर केल्याचेही वृत्त आहे आणि दोन अमेरिकन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणी माध्यमांच्या अहवालानुसार, एफ-15E विमानाला मध्य इराणच्या आकाशात लक्ष्य करण्यात आले होते आणि ते कोहगिलुयेह व बोयर-अहमद प्रांतात कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, इराणी अधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बचाव पथकाला अजूनही इराणमधून सुरक्षित ठिकाणी बाहेर पडायचे असून बचाव मोहीम अद्याप सुरूच आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande