ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी मंगळवारपर्यंत वाढवली अंतिम मुदत
वॉशिंग्टन , 06 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत चालला आहे. दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धविराम करण्यासाठी दिलेली मुदत पुन्हा एकदा वाढवत मंगळवारची अंतिम मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी स
ट्रम्प यांनी युद्धविरामासाठी मंगळवारपर्यंत वाढवली अंतिम मुदत


वॉशिंग्टन , 06 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत चालला आहे. दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धविराम करण्यासाठी दिलेली मुदत पुन्हा एकदा वाढवत मंगळवारची अंतिम मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, इराणने लवकरात लवकर होर्मुज सामुद्रधुनी खुली केली नाही आणि करार केला नाही, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत लिहिले, “मंगळवार रात्री ८ वाजता (ईस्टर्न टाइम)!” यापूर्वीही त्यांनी कठोर शब्दांत इशारा देत सांगितले होते की, इराणने मार्ग खुला केला नाही तर अमेरिका इराणची ऊर्जा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते. त्यांनी असेही म्हटले की, “जर होर्मुज सामुद्रधुनी उघडली गेली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पूल हे सर्व लक्ष्यावर असतील.”

माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता; मात्र नंतर ही मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली. आता ही अंतिम मुदत ८ एप्रिलच्या रात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, कराराची शक्यता अजूनही कायम आहे; परंतु चर्चा अपयशी ठरल्यास ते “सर्व काही संपवतील” असा इशाराही त्यांनी दिला.

ट्रम्प यांनी असा दावाही केला की, इराणमधील सामान्य जनता त्यांच्या सरकारवर समाधानी नाही आणि अमेरिकेच्या कारवाईला समर्थन देऊ शकते. यापूर्वी त्यांनी इराणमधील एका मोठ्या पुलावर हल्ला करून तो पाडल्याचा दावा केला होता आणि लवकर करार झाला नाही तर आणखी मोठे हल्ले होऊ शकतात, असा इशारा दिला होता.

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. एका बाजूला चर्चेचे प्रयत्न सुरू असताना, दुसऱ्या बाजूला कठोर विधानबाजी आणि संभाव्य लष्करी कारवाईची शक्यता सातत्याने वाढत आहे. येणारे काही दिवस या संपूर्ण प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande