
नाशिक, 07 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र कंपनी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकाकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे कंपनी स्पोर्ट्स अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा संघटक तथा नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राहुल देशमुख यांचा विविध क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा उपक्रमांच्या आयोजनामध्ये मोलाचा सहभाग असतो. ते स्वतः एक व्यावसायिक असून, विविध संस्थांमध्ये विविध पदे भूषवित आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी अंजली देशमुख यांच्या हस्ते या स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंनी आकर्षक चषक, मेडल्स आणि डायरी प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी ऑल इंडिया कंपनी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष पी. के. पांडा, क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, अशोक कदम, अविनाश ढोली, दीपक निकम, कामिनी केवट, अविनाश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेत कबड्डी आणि हॅण्डबॉल या दोन खेळामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत पुरुषांच्या गटाचे विजेतेपद आपल्या नांवे केले. पुरुषांच्या हॅण्डबॉलमध्ये पंजाब संघाने दुसरा तर ओरिसा संघाने तिसरा क्रमांक मिळविला. व्हॉलीबॉलमध्ये दिल्लीच्या पुरुष आणि महिला या दोन्हीही संघांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपदाचा दुहेरी मुकुट पटकाविला. व्हॉलीबॉल पुरुष गटामध्ये ओरिसा संघाने दुसरे स्थान मिळविले तर बिहार संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. व्हॉ लीबॉल महिला गटात गुजराथ संघाने दुसरा तर बिहार संघाने तिसरा क्रमांक मिळविला. विदर्भच्या महिला कबड्डी संघांनीही चांगला खेळ करून विजेतेपद मिळविले. फुटसॉल मध्ये मणिपूरच्या खेळडूंनी सुंदर खेळ करून विजेतेपद मिळविले.
यावेळी राहुल देशमुख यांच्या क्रीडा क्षेत्रासाठीच्या योगदानाबद्दल त्यांची आयोजकांच्या वतीने पुस्तक तुला करण्यात आली. ही पुस्तके आणि वह्या गरीब .गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे असे त्यांनी जाहीर केले. या वेळी बोलतांना राहुल देशमुख यांनी सांगितले की, खेळाडूं मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उंचावत असतात. त्यांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी माझ्याकडून आणि माझ्या संस्थांकडून कायमच सहकार्य दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले. यावेळी ऑल इंडिया कंपनी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष पी. के. पांडा यांनी या स्पर्धाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक कदम, दीपक निकम, राजू शिंदे, कामिनी केवट, अविनाश वाघ, ज्योती निकम, सतीश बोरा, अंकुश सिंग,आशिष प्रजापती, पिराजी कुसळे आणि विविध खेळांचे तांत्रिक अधिकारी यांनी जबाबदारे पार पाडली.
स्पर्धेचा निकाल :-व्हॉलीबॉल - पुरुष - `१) दिल्ली २) ओरिसा, ३) बिहार कबड्डी - पुरुष - `१) महाराष्ट्र २) ओरिसा, ३) विदर्भ हॅण्डबॉल - पुरुष - `१) महाराष्ट्र २) पंजाब, ३) ओरिसा. फुटसॉल - पुरुष - `१) मणिपूर २) महाराष्ट्र, ३) विदर्भ.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV