दंतेवाडा हल्ल्याच्या स्मृतीदिनी, हुतात्म्यांना अभिवादन
आदिवासी जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते पोहचले ताडमेटला येथे दंतेवाडा, 7 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार गावाजवळील ताडमेटला परिसरात 6 एप्रिल 2010 रोजी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर भ्याड हल्ला केला होता. यात 7
दंतेवाडा हल्ल्याच्या स्मृतीदिनी, हुतात्म्यांना अभिवादन करताना दत्ता शिर्के व इतर कार्यकर्ते


आदिवासी जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते पोहचले ताडमेटला येथे

दंतेवाडा, 7 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार गावाजवळील ताडमेटला परिसरात 6 एप्रिल 2010 रोजी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर भ्याड हल्ला केला होता. यात 75 जवानांना हौतात्म्या आले होते. या वीज जवानांच्या पुण्यतिथीला जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी दंतेवाडा येथे जाऊन पुष्पांजली अर्पण करत हुतात्म्यांना अभिवादन केले.

यासंदर्भात आदिवासी जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के म्हणाले की, गेल्या 30 मार्च रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा केली. सरकारचे पाठबळ आणि सुरक्षा दलांचे शौर्य याबळावर देशातील आदिवासी भाग आणि समाज खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतोय. परंतु, आजचा चांगला दिवस ज्या जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानामुळे आपण सर्वजण पाहू शकलो त्यांचे विस्मरण कधीही होऊ नये. कुठल्याही व्यवस्थापरिवर्तनासाठी हिंसाचार हे माध्यम होऊ सकत नाही. हिंसेमुळे आजवर कुणाचेही भले झालेले नाही. आदिवासी आणि दलितांवर अन्याय करून आणि खंडण्या वसुल करणारे नक्षलवादी हे संविधानाच्या विरोधात होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान करणारी हिंसक विचारधारा संपुष्टात येणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बंदुकीच्या जोरावर गोर-गरीब समाज आणि निरक्षरांची पिळवणूक करण्यापलिकडे नक्षलवादाने समाजाला काहीच दिलेले नाही. नक्षलवादाच्या इतिहासात 6 एप्रिल 2010 हा काळा दिवस देशभक्त नागरिक कधीच विसरणार नाहीत. त्यामुळेच आम्ही देशभक्त भारतीयांच्यावतीने ताडमेटला येथे जाऊन वीर जवानांना आवर्जुन अभिवादन करतो. नक्षलवाद विरोधी लढ्यातील या जवानांचे योगदान कायम स्मरणात ठेवले जाईल असे शिर्के यांनी सांगितले.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande