बीसीबीमध्ये नेतृत्व बदल; तमीम इक्बाल यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
ढाका, 08 एप्रिल (हिं.स.)। बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ७ एप्रिल रोजी बरखास्त करण्यात आले. बीसीबीचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार, अमीनुल इस्लाम बुलबुल यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. पुढील निवडणुका होईपर्यंत बीसीबीचा दैनंदिन कारभार सांभाळण्
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड लोगो


ढाका, 08 एप्रिल (हिं.स.)। बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ७ एप्रिल रोजी बरखास्त करण्यात आले. बीसीबीचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार, अमीनुल इस्लाम बुलबुल यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. पुढील निवडणुका होईपर्यंत बीसीबीचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी तमीम इक्बाल यांच्या अध्यक्षतेखालील एका तदर्थ समितीवर सोपवण्यात आली आहे. बांगलादेश राष्ट्रीय क्रीडा परिषदेने हा निर्णय घेतला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) देखील याची माहिती देण्यात आली आहे.

२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी, पाकिस्तानच्या दबावाखाली, बांगलादेश बोर्डाने भारतातील क्रिकेटपटूंच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करत आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता आणि आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. आयसीसीने नकार दिला आणि स्पर्धेत स्कॉटलंडला पसंती देत बांगलादेशला वगळले.बांग्लादेश बोर्डाने अंतरिम सरकारचे सल्लागार आसिफ नझरुल यांच्या सांगण्यावरून भारतविरोधी भूमिका घेतली होती. अमीनुल इस्लाम यांनी त्यांच्या निर्णयांना विरोध केला नाही. आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. बांगलादेशमध्ये आता नवीन सरकार आले आहे आणि ते भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, बीसीसीआयशी मैत्री करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच, बीसीबीने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रस्तावित मालिकेसंदर्भात माहिती मागवण्यासाठी बीसीसीआयला एक ईमेल पाठवला.

अमीनुलमुळे अलीकडच्या काळात बीसीबीच्या सहा संचालकांनी राजीनामा दिला. आता तमीम इक्बाल बीसीबीचा कार्यभार स्वीकारतील. त्यांच्यासोबत १० सदस्य असतील. हे सदस्य पुढील ९० दिवसांत संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्यावर लक्ष केंद्रित करतील. तमीम बांगलादेशचा कर्णधार राहिला आहे आणि तो देशातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याच्यासोबत अथर अली खान, रश्ना इमाम, मिर्झा यासिर अब्बास, सय्यद इब्राहिम अहमद, मिन्हाजुल अबेदीन नन्नू, इशरफिल खुसरो, तन्झिम चौधरी, सलमान इस्पाहानी, रफीकुल इस्लाम आणि फहीम सिन्हा हे सदस्य आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande