ऍक्सिस म्युच्युअल फंडकडून ‘निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड’ लाँच
-संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस नवी संधी नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.) : भारतातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ऍक्सिस म्युच्युअल फंडने ‘अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड’ ही नवी फंड ऑफरिंग (एनएफओ) जाहीर केली आहे. हा ओपन-एंडेड इंडेक्स फंड
म्युच्युअल फंड लोगो


-संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस नवी संधी

नाशिक, 09 एप्रिल (हिं.स.) : भारतातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ऍक्सिस म्युच्युअल फंडने ‘अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड’ ही नवी फंड ऑफरिंग (एनएफओ) जाहीर केली आहे. हा ओपन-एंडेड इंडेक्स फंड असून तो निफ्टी इंडिया डिफेन्स टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) मधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. हा एनएफओ 10 एप्रिल पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 24 एप्रिल 2026 रोजी बंद होईल.

या फंडाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे संबंधित निर्देशांकाच्या कामगिरीशी जुळणारा परतावा देणे, खर्च वजा करून आणि ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून. वाढता जागतिक संरक्षण खर्च, भारतातील संरक्षण क्षेत्राचे वेगवान आधुनिकीकरण आणि स्वदेशी उत्पादनाला मिळणारा सरकारी पाठिंबा यामुळे निर्माण झालेल्या दीर्घकालीन संधींचा फायदा गुंतवणूकदारांना या फंडाद्वारे मिळणार आहे.

जागतिक पातळीवर वाढता भू-राजकीय तणाव आणि प्रादेशिक संघर्ष यांमुळे 2024 मध्ये संरक्षण खर्च 2.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर विकसित आणि विकसनशील देशांकडून संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. भारतही या स्पर्धेत पुढे असून संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. भारताचा संरक्षण अर्थसंकल्प 2014 पासून जवळपास 2.7 पट वाढून 2026 मध्ये सुमारे 6.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

याशिवाय, गेल्या 5 वर्षांत देशांतर्गत संरक्षण उत्पादन दुपटीने वाढले असून 2029 पर्यंत ते पुन्हा दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. संरक्षण निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली असून 2017 मधील 2 हजार कोटी रुपयांवरून 2025 मध्ये ती 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.या निर्देशांकात एरोस्पेस, जहाजबांधणी, स्फोटके आणि संरक्षणाशी संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांची निवड विशिष्ट निकषांवर आधारित असून दर 6 महिन्यांनी निर्देशांकाचे पुनर्संतुलन केले जाते.

ऍक्सिस एएमसीचे एमडी व सीईओ बी. गोपकुमार यांनी सांगितले की, भारताचे संरक्षण क्षेत्र सध्या मोठ्या बदलाच्या टप्प्यात असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही उत्तम संधी आहे. या फंडाचे व्यवस्थापन नंदीक मल्लिक आणि रोहित गौतम करतील. हा पॅसिव्ह फंड असल्याने गुंतवणूकदारांना कमी खर्चात विविध संरक्षण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. मात्र, क्षेत्र-आधारित गुंतवणूक असल्याने अल्पकालात चढ-उतार होण्याची शक्यता असून दीर्घकालीन आणि एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande