सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगाव , 09 एप्रिल (हिं.स.)सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली असून, सराफा बाजारात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कालच अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या
सोने लोगो


जळगाव , 09 एप्रिल (हिं.स.)सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली असून, सराफा बाजारात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कालच अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या एका दिवसातच दर घसरल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजच्या घसरणीत सोन्याच्या दरात सुमारे २ हजार १०० रुपयांची घट झाली असून, चांदीच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. दरातील या अचानक झालेल्या बदलामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २ हजार १०० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे आता सोन्याचा दर १,५१,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,८७२ रुपयांनी घसरून १,२१,१८४ रुपयावर पोहोचले. तसेच आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २,१५० रुपयांनी घसरून १,३८,८५० रुपये झाले आहेत. तर १८ कॅरेट सोन्याचे दर १,७६० रुपयांनी घसरून १,३६,६१० रुपये झाले आहेत. तर आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदी दरात ७००० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे चांदीचा एक किलोचा दर २,५५,००० रुपयावर पोहोचला आहे. तज्ञांच्या मते, काल सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली. त्यामुळे आज दरावर दबाव निर्माण झाला. याशिवाय, शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतरही इराणकडून सावध भूमिका घेतली जात असल्याने जागतिक स्तरावर अनिश्चितता कायम आहे, ज्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक घडामोडी, गुंतवणूकदारांची भूमिका आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार सुरू असून, येत्या काही दिवसांतही हा कल कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande