इराणची सेना कमकुवत आणि अर्थव्यवस्था कोलमडली, ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन , 01 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराणच्या परिस्थितीवर अनेक मोठे दावे केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे इराणची सेना मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या फा
इराणची सेना कमकुवत आणि अर्थव्यवस्था कोलमडली, ट्रम्प यांचा दावा


वॉशिंग्टन , 01 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराणच्या परिस्थितीवर अनेक मोठे दावे केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे इराणची सेना मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या फाशी थांबवण्यात मदत झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करताना हे वक्तव्य केले.

ट्रम्प यांनी आरोप केला की, इराणमध्ये गेल्या दोन महिन्यांत आंदोलनांदरम्यान 42,000 लोकांची हत्या करण्यात आली. त्यांनी म्हटले की हे लोक निःशस्त्र होते आणि केवळ विरोध केल्यामुळे त्यांना मारण्यात आले. ट्रम्प यांनी दावा केला की इराण आठ महिलांना फाशी देण्याच्या तयारीत होता, मात्र त्यांनी फोनवर हस्तक्षेप करून ते थांबवले. ते म्हणाले, “मी त्यांना सांगितले – असे करू नका, संपूर्ण जग पाहत आहे. त्यांनी तसे केले नाही, याचा मला आनंद आहे.”

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिका आणि इराण यांच्यात पूर्ण युद्ध नाही, तर ही एक लष्करी मोहीम आहे. त्यांनी सांगितले इराणचे नौदल पूर्णपणे नष्ट झाले आहे.वायुदलही जवळपास संपुष्टात आले आहे ड्रोन कारखान्यांपैकी सुमारे 82% नष्ट झाले आहेत. क्षेपणास्त्र कारखाने जवळपास 90% उद्ध्वस्त झाले आहेत. ट्रम्प यांनी म्हटले की इराण आता करारासाठी आतुर आहे.

पुढे ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेची नाकेबंदी अत्यंत प्रभावी ठरली आहे. इराणला तेलातून कोणतीही कमाई होत नसून त्याची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की लवकरच काहीतरी करार होईल.

अमेरिकन अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की शेअर बाजाराने नवे उच्चांक गाठले आहेत. त्यांनी म्हटले की, जेव्हा डॉव 50,000 आणि एसअँडपी 7,000 च्या पुढे गेले, तेव्हा त्यांनी इराणच्या मुद्द्यावर काहीतरी करण्याचा विचार केला. ट्रम्प यांनी पुन्हा स्पष्ट केले की इराणला कधीही अण्वस्त्र बनवू दिले जाणार नाही. दरम्यान, इराणच्या संसदाध्यक्षांनी सांगितले की तेहरान फारसच्या आखाताची सुरक्षा सुनिश्चित करेल आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी होर्मुज सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण अधिक मजबूत करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande