
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गुजरात दिनाच्या निमित्ताने दोन्ही राज्यांतील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दोन्ही राज्यांच्या समृद्ध परंपरेचे आणि देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
तर गुजरात दिनानिमित्त आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हणाले की, हा दिवस गुजरातच्या समृद्ध इतिहासाचा, रंगीबेरंगी संस्कृतीचा आणि अदम्य जिज्ञासा व उत्साहाचा उत्सव साजरा करण्याचे प्रतीक आहे. गुजरातच्या भूमीवर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या गतिशीलता, मेहनत आणि उद्योजकतेच्या भावनेमुळे जगभरात नेहमीच ओळख मिळाली आहे. राज्याने देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भावी काळात गुजरातने प्रगतीच्या नवीन शिखरांवर झेप घ्यावी, ही मनःपूर्वक शुभेच्छा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule