
मुंबई, 18 मे (हिं.स.) : भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने १८ मे २०२६ पासून १ ते ३ वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या आणि ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या मुदत ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. सुधारित दरानुसार १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी वार्षिक ६.५० टक्के, २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी वार्षिक ६.६० टक्के आणि ३ वर्षांसाठी वार्षिक ६.७० टक्के असे राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ६ महिने ते ३ वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर अनुक्रमे वार्षिक ०.५० टक्के आणि ०.६५ टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. तीन वर्षे आणि त्यावरील मुदतीच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याजावरील दराव्यतिरिक्त अतिरिक्त ०.७५ टक्के प्रति वर्ष आणि ०.९० टक्के प्रति वर्ष व्याज मिळेल. याव्यतिरिक्त, परत न मागवता येणाऱ्या ठेवींवर (₹ १ कोटींपेक्षा जास्त आणि किमान १ वर्षाच्या मुदतीसह) अतिरिक्त ०.१५ टक्के प्रति वर्ष व्याज मिळेल. मुदत ठेवीवरील कर्ज आणि मुदतपूर्व पैसे काढण्याचे पर्याय केवळ परत मागवता येणाऱ्या ठेवींवरच उपलब्ध आहेत. ग्राहक बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत किंवा बीओआय ओम्नी निओ ॲप/इंटरनेट बँकिंगद्वारे आपल्या मुदत ठेवी उघडू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी