आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर घसरला
जळगाव, 18 मे (हिं.स.)सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाढीला अखेर ब्रेक लागला आहे. आज, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला म
गोल्ड  लोगो


जळगाव, 18 मे (हिं.स.)सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाढीला अखेर ब्रेक लागला आहे. आज, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे (१० ग्रॅम) थेट ७१० रुपयांनी घसरले आहेत.

गेल्या आठवड्यात सोन्याने उच्चांकी पातळी गाठल्यामुळे लग्नसराई आणि इतर कारणांसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.मात्र, आज झालेल्या या लक्षणीय घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५६,२२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५६८ रुपयांनी घसरले असून हे दर १,२४,९७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,१०० रुपयांनी घसरले असून हे दर १५,६२,२०० रुपये झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande