महाराष्ट्राचे हिंदू राष्ट्र निर्मितीचे दायित्व
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपादशाही हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहिण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले, मराठ्यांचा इतिहास स्वतंत्रपणे सुद्धा कितीही महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असला तरी तो म्हणजे प्रत्यक्ष हिंदु राष्ट्राच्या, हि
महाराष्ट्र


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपादशाही हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहिण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले, मराठ्यांचा इतिहास स्वतंत्रपणे सुद्धा कितीही महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असला तरी तो म्हणजे प्रत्यक्ष हिंदु राष्ट्राच्या, हिंदुस्तानच्या इतिहासाचा एक भाग आहे. या सर्व भागांना आपल्यात समाविष्ट करणारा समग्र ग्रंथ म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास, तेव्हा मराठ्यांच्या इतिहासाच्या परीक्षणाचे काम हाती घेण्यात आमचा हेतू यच्चयावत घडामोडीच्या सामान्य गोंधळातून ज्या महत्त्वाचा घटना वेचून काढून थोडक्यात स्पष्टपणे मांडल्या असता अखिल हिंदूजातीय हितसंबंधाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासाचे महत्त्व उत्तम रीतीने अजमावणे आणि समजून घेणे हे अखिल हिंदुस्तानच्या इतिहासाच्या समग्र ग्रंथातील त्याच्या संबंध स्पष्ट करून त्यात योग्य स्थानी बसवणे शक्य तितके सुलभ होईल तेवढ्याच घटना प्रामुख्याने पुढे आणणे हा होता. तेवढ्यासाठी मराठी आंदोलनाचे इतिवृत्त शक्य तित्या संक्षिप्तपणे कथन करणे आणि त्यांच्यासारख्या सबंध राष्ट्राला प्रेरक शक्तीने, ज्या अखंड निर्झराने, ज्या प्रभावी उद्दाम स्थानाने त्यांच्या हातून बलिष्ठ साम्राज्याची उभारणी होईपर्यंत साक्षेपी व्हावयाला, झगडावयला आणि आत्मयज्ञ करायला एकसारखे प्रोत्साहन दिले जाते त्याचा निश्चय करणे आवश्यक आहे.

याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गारोहणानंतर मराठ्यांच्या इतिहासाचे स्वरूप हळूहळू अधिक व्याप्त होत गेल्यामुळे तो केवळ महाराष्ट्राचा इतिहास राहत नाही. म्हणूनच त्याचे संकुचित रूप नाहीसे होऊन त्याची व्याप्ती हिंदुस्थानभर होते आणि तो अखिल हिंदुस्थानचा इतिहास गणला जाण्या इतके विशाल स्वरूप त्याला प्राप्त होते. विशेष म्हणजे याचे हे विशाल स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्य् शपथेत दडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धनीतीच्या तंत्राद्वारे तर रामदास स्वामींनी राजकीय प्रबोधनाच्या द्वारे महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे बीज रोवले. त्यांच्या कार्याने महाराष्ट्रातील जनतेच्या समोर एक दिव्य ध्येय उभे केले. याविषयी सावरकर लिहितात.... हिंदूजातीची परकीय अहिंदू अधिपत्त्याच्या राजकीय आणि धार्मिक शृंखलेतून मुक्तता करणे परकीय आक्रमणाचे आणि धर्मवेडाने उत्पन्न झालेल्या अभिनिवेशाचे प्रयत्न निष्फळ करण्यासाठी ज्याचा हिंदू संस्कृतीला, हिंदू धर्माला, सामर्थ्याचा अभेद्य गडाप्रमाणे एकाद्या प्रचंड कोटाप्रमाणे उपयोग होईल, असे बलिष्ठ हिंदूसाम्राज्य स्थापन करण्याचे ध्येय शिवरायांनी त्यांच्या कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्यातील जनतेस समोर ठेवले.

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांचे पिताश्री शहाजीराजांना दिसले. स्वधर्मराज्यापासून प्रौढ प्रतापी पुरंदर शिवाजीमहाराजांनी या संक्षिप्त निरीक्षणाच्या आरंभी सर्वनिष्ठा राष्ट्राच्या पायी समर्पित केल्या आणि आपले ध्येय आपल्या सवंगड्यांना सांगून त्या ध्येयप्राप्तीसाठी शपथबद्ध करून घेतले. हिंदवी स्वराज्यापासून तो थेट बाजीरावांच्या हिंदू पदपादशाहीपर्यंत आणि पंतप्रधानांचे बुद्धिवान प्रतिनिधी गोविंदराव काळे यांनी विजयी प्रौढीने या हिंदूपदोपादशाहीचे हे हिंदुस्थान आहे तुर्कस्तान नव्हे असे वर्णन केले. त्यापर्यंत साम्राज्याचे जिवंत ध्येय या सर्वप्रभाव पूर्ण चळवळीतून अखंडपणे स्फुरत असल्याचे आणि सळसळत असल्याचे आपल्याला आढळून येते.

छत्रपती शिवरायांनी छत्रसालाला स्वपराक्रमावर आपले सिंहासन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रेरणा दिली. त्या वीराने शिवरायांच्या मार्गदर्शना प्रमाणे स्वतःचे राज्य बळकट केले. वृद्ध झाल्यावर आपल्या राज्याचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी पहिल्या बाजीरावांना पत्राने कळवून त्यांचे सहाय्य घेतले. महाराष्ट्र हा संपूर्ण हिंदूराष्ट्राचे खड्ग आहे याची प्रचिती त्यावेळी इतिहासाने घेतली. हे जाणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराष्ट्र हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे. असे गौरवपूर्ण उद्गार काढले.

संपूर्ण हिंदुस्थानचे कोणत्याही परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावे याचा विचार संपूर्ण हिंदुस्थान ने केला पाहिजे. हिंदुस्थान मधल्या मोजक्याच राज्यांनी करता कामा नये. अशी शिकवण देण्याची धमक केवळ महाराष्ट्रात आहे. म्हणून महाराष्ट्राने हिंदुस्थानातील सर्व राज्यांचे नेतृत्व करून त्यांना संघटित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केली आहे.

मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या निश्चयाने बाहेर पडतात. त्यांना त्यांच्या धर्माव्यतिरिक्त इतर सर्व धर्मामते म्हणजे केवळ नरकात जावयाच्या प्रवेशपत्रिका आहेत असे वाटते. या सर्वांवर सैतानी संस्कार करण्यात आले आहेत. अन्याय करणे, अत्याचार करणे, बलात्कार करणे, दुसऱ्याची संपत्ती ओरबाडणे, अन्य धर्मीयांची देवालय उध्वस्त करून स्वतःच्या प्रार्थना स्थळात त्यांचे रूपांतर करणे, इतर धर्माच्या अनुयायांचे धर्मांतरण करून आपले संख्याबळ वाढवणे, आमच्या धर्माचा स्वीकार करा अथवा मरा असे दोनच पर्याय इतर धर्मियांसमोर ठेवणे, अशा सैतानी कुसंस्कारांनी मंडित झालेल्या समाजाच्या विरोधात संघटितपणे लढा देण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू समाजाला संघटित करून हिंदूराष्ट्र सबल करण्याचे दायित्व शिवरायांच्या महाराष्ट्रावर आहे.

या अखिल भारतखंडात मुसलमानांच्या राजकीय बंधनापासून या भूमीची आणि या राष्ट्राची मुक्तता करावी अशी ज्याला तळमळ लागली आहे आणि असे ज्यांचे सामर्थ्य आहे असा कोणी हिंदू राहिला नाही. जर काही अशा कोणाविषयी करता येईल तर ती केवळ महाराष्ट्र विषयीच करता येईल. अशी आशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या शपथेने अखिल हिंदु राष्ट्राच्या मनात निर्माण केली आहे. हे नेमकेपणाने जाणून स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्र हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे, असे उच्चरावाने घोषित करतात.

आपल्या देशात ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी महाराष्ट्रानेच नेतृत्व केलेले दिसून येते. १८५७ चे स्वातंत्र्यसमर असेल, वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली सशस्त्र क्रांती असेल, लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या अंधारातून मुक्त होण्यासाठी शिवजयंती उत्सव चालू करण्यामागचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली सशस्त्र क्रांतिकारकांची अभिनव भारत ही संघटना. या सर्व क्रांतिकारी घटनांचा आढावा घेतला तर महाराष्ट्रानेच हिंदू राष्ट्राच्या रक्षणार्थ नेतृत्व केल्याचे आढळून येते.

म्हणूनच या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचे हिंदुराष्ट्र निर्मिती विषयी असलेले दायित्व विसरू नये. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी अखिल हिंदू समाजाला संघटित करण्याचे महान कार्य हाती घेऊन शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या परंपरेचे कृतिशील समर्थक आहोत याचा विश्वास हिंदू समाजाला देऊन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करावा.

- दुर्गेश जयवंत परुळकर

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande