राघव चड्ढांच्या व्यक्तिमत्व हक्क प्रकरणातील निकाल दिल्ली हायकोर्टाने ठेवला राखून
- राजकीय टीका ही व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन नाही, न्यायालयाची भूमिका नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.)दिल्ली उच्च न्यायालयाने, भाजपमध्ये सामील झालेले आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या गोपनीयतेच्या हक्कांच्या संरक्षणाची मागणी कर
राघव चड्ढा


- राजकीय टीका ही व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन नाही, न्यायालयाची भूमिका

नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.)दिल्ली उच्च न्यायालयाने, भाजपमध्ये सामील झालेले आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या गोपनीयतेच्या हक्कांच्या संरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेतली. त्यानंतर न्यायालयाने अंतरिम याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने असे मत व्यक्त केले की, राजकीय निर्णयावर टीका करणे हे व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन नाही आणि राघव यांना मानहानीचा खटला दाखल करण्याचा सल्ला दिला.

खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या व्यक्तिमत्व आणि गोपनीयतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुब्रमणियम प्रसाद यांच्यासमोर झाली. राघव यांनी अज्ञात संस्था तसेच काही ज्ञात प्रतिवादींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो आणि इतर वैयक्तिक वस्तूंचा गैरवापर रोखता येईल.

या याचिकेत, राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या डीपफेक, फेरफार केलेले व्हिडिओ, कृत्रिम आवाजाची नक्कल, बदललेली दृश्ये, बनावट भाषण आणि दिशाभूल करणाऱ्या डिजिटल सामग्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आपली गोपनीयता आणि प्रसिद्धी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अलीकडेच न्यायालयात धाव घेतलेल्या प्रमुख अभिनेते, क्रिकेटपटू, राजकारणी आणि इतर सेलिब्रिटींच्या वाढत्या यादीत राघवचाही समावेश झाला आहे.

न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरूर आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासारख्या राजकीय व्यक्तींच्या वैयक्तिक अधिकारांनाही मान्यता दिली आहे. थरूर यांनी एआय वापरून तयार केलेले बनावट व्हिडिओ हटवण्यासाठी न्यायालयाकडे अपील केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande