पंतप्रधान २३ मे रोजी १९व्या रोजगार मेळ्याचे करणार उद्घाटन
नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १९व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान देशभरातील ५१ हजारांहून अधिक नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रांचे
PM May 23 inaugurate 19th Rozgar Mela


नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १९व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान देशभरातील ५१ हजारांहून अधिक नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करणार असून त्यांना संबोधितही करणार आहेत.

देशभरातील ४७ ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या रोजगार मेळ्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रेल्वे मंत्रालय, संचार मंत्रालय (डाक विभाग), संरक्षण मंत्रालय, वित्त मंत्रालय यांसह अनेक विभागांमध्ये केली जाणार आहे.

याच अनुषंगाने पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागातही रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वडोदरा येथील रेल्वे ऑडिटोरियम, प्रतापनगर रेल्वे कॉलनी येथे आयोजित कार्यक्रमात एकूण ८५ निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे विभागातील १५, वित्तीय सेवा विभागातील ५० तसेच पोस्ट ऑफिसमधील २० उमेदवारांचा समावेश आहे.

वडोदरा येथे आयोजित कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता सुरू होणार आहे. या समारंभाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, मितेश पटेल, राजपालसिंह जादव, जशुभाई राठवा, मनसुखभाई वसावा, देवुसिंह चौहान, मुकेशकुमार दलाल, परभुभाई वसावा तसेच आमदार योगेश पटेल, बालकृष्ण शुक्ला, मनीषाबेन वकील, केयूरभाई नारायणदास रोकडिया, चैतन्य देसाई, धर्मेंद्रसिंह वाघेला आणि केतनभाई ईनामदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रोजगार मेळा हा युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande