चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात चार महिला ठार, तेंदूपत्ता संकलन जीवावर बेतले
चंद्रपूर, 22 मे (हिं.स.)। जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला ठार झाल्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सद्या तेंदूपत्त्याचा हंगाम सुरु आहे.
वाघ हल्ला


चंद्रपूर, 22 मे (हिं.स.)। जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला ठार झाल्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

सद्या तेंदूपत्त्याचा हंगाम सुरु आहे. तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गावकरी जंगलात जातात, वाघाच्या कॉरिडॉर मध्ये तेंदुपत्त्यांची झाडे असल्याने नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जंगलात जातात. पहाटे गावकरी जंगलात जात तेंदूपत्ता संकलन करीत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास काही महिला गुंजेवाहीच्या जंगलात गेल्या होत्या, तेंदूपत्ता गोळा करीत असताना अचानक वाघाने महिलांवर हल्ला केला. त्यामध्ये कवडाबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनिताबाई दादाजी मोहुर्ले (४०), संगीता संतोष चौधरी (५०) व सुनीता कौशिक मोहुर्ले (३८) यांचा समावेश आहे. महिलांवर एकाच वाघाने हल्ला केला की अजून काही वाघ त्याठिकाणी होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील वॉर्ड क्रमांक एक मधील 'भट्टी मोहल्ला' परिसरातील १३ महिलांचा एक गट पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जंगलात गेला होता. सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने, या सर्व महिला खैरीचक जवळील घनदाट जंगलात पाने तोडण्याच्या कामात व्यग्र होत्या. मात्र, तिथेच एका झुडपात दबा धरून बसलेल्या वाघिणीची त्यांना अजिबात चाहूल लागली नाही. शिकार शोधत असलेल्या या वाघिणीने अत्यंत अचानक आणि हिंसक पद्धतीने या महिलांच्या गटावर हल्ला चढवला. हा प्रसंग इतका अनपेक्षित होता की, महिलांना स्वतःला सावरण्याची किंवा जीव वाचवून पळण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

२०२६ च्या ५ महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षात जिल्ह्यात एकूण १९ गावकऱ्यांचा बळी गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande