दिल्ली दंगल : उमर खालिदला तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर
नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : दिल्ली उच्च न्यायालयाने 2020 मधील दिल्ली दंगली प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मानवीय दृष्टिकोन स्वीकारत हा दिलासा देणार
उमर खालिद, संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : दिल्ली उच्च न्यायालयाने 2020 मधील दिल्ली दंगली प्रकरणातील आरोपी उमर खालिद याला त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मानवीय दृष्टिकोन स्वीकारत हा दिलासा देणारा निर्णय दिला.

उत्तर-पूर्व दिल्ली दंगलीतील मोठ्या कटाशी संबंधित यूएपीए प्रकरणात उमर खालिद गेल्या साडेपाच वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्याच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांच्यासोबत राहण्यासाठी अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करताना कठोर अटीही घातल्या आहेत. खालिद यांना फक्त त्यांच्या निश्चित पत्त्यावर म्हणजेच घरी राहण्याची परवानगी असेल. तसेच, ते केवळ आईला भेटण्यासाठी रुग्णालयात जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा अन्यत्र जाण्यास मनाई करण्यात आली आहे.अंतरिम जामिनासाठी उमर खालिद याला 1 लाख रुपयांचा जामीन बाँड भरावा लागणार आहे. तसेच, जामीन कालावधीत तो फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरू शकेल. तसेच या नंबरची माहिती तपास यंत्रणेला देणे बंधनकारक असेल.

यापूर्वी खालच्या न्यायालयाने उमरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. कुटुंबातील इतर सदस्य आईची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे कारण देत अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर उमर खालिद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना गंभीर शस्त्रक्रियेच्या वेळी मुलगा आईसोबत असणे आवश्यक असल्याची विनंती केली होती.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande