
जालना, 22 मे (हिं.स.)।
मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदींचे काय झाले? नोंदी सापडूनही तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? मुंबईतील आंदोलनावेळी दिलेली आश्वासने सरकारने 8 महिने लोटले तरी पूर्ण केले नाही. या प्रकरणी सरकारने आमची दिशाभूल केली. सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
…तर मी उद्या सकाळी फाशी घेतो – जरांगे
आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना कधीही वाईट बोललो नाही, मग आमच्यावर लाठीचार्ज का करण्यात आला? मला पैशाचे किंवा पदाचे आमिष दाखवून कोणीही फोडू शकत नाही. मी सरकारकडून एक रुपया घेतला किंवा काम घेतले, असे कोणीही सिद्ध करून दाखवावे. जर असे सिध्द झाले तर मी मी उद्या सकाळी फाशी घेतो, असे जरांगे म्हणाले.
जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या.
सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे, मरिज संस्थानाचा 1994 च्या धर्तीवर जीआर काढा.
महाराष्ट्रात मराठा तरुणांवर नोंदवलेले गुन्हे सरसकट मागे घ्या.
आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांना महावितरण व एमआयडीसीत नोकरी देण्याचा जीआर काढा.
सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
महामंडळांचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करा.
वितरित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी द्या.
मराठा उपसमिती बरखास्त करा.
स्वतंत्र कुणबी व मराठा मंत्रालय स्थापन करा.
शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्या.
---------------
---------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis