आंतरवाली सराटीत लाड - जरांगेंत चर्चा : स्वतंत्र कुणबी-मराठा मंत्रालय स्थापन करण्याची आग्रही मागणी
जालना, 22 मे (हिं.स.)। मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आं
Q


जालना, 22 मे (हिं.स.)।

मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे संभाव्य आंदोलन मागे घेण्याचे आंदोलन केले. त्यावर जरांगे यांनी सध्या तरी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. पण सरकारने मराठा समाजाला अद्याप सरसकट कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही? असा सवाल करत लाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या आवाहनावर जरांगे कोणती भूमिका घेतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे यांनी येत्या 30 तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचे रान पेटले आहे. जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी नुकतीच प्रसाद लाड यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार लाड यांनी आज त्यांची आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत प्रदिर्घ काळ चर्चा झाली. त्यात लाड यांना जरांगे यांना सध्याचा उन्हाचा कडाका व शेतीच्या मशागतीची कामे पाहता त्यांचे आगामी उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन केले.

प्रसाद लाड म्हणाले, सध्या कडाक्याचे उन पडले आहे. तसेच खरीप हंगामाचीही कामेही सुरू आहेत. त्यामुळे माझे मनोज जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे उपोषण लांबणीवर टाकण्याचे आवाहन आहे. सरकार आपल्या जागी आहे. मी मराठा समाजातर्फे त्यांना हे आवाहन करत आहे. मी गीतेतला सार घेऊन येथे आलो आहे. मुख्यमंत्री जातीचे नसतानाही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. हा जरांगे यांचाच विजय आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले.

जरांगे व माझ्यात अनेकदा वाद

प्रसाद लाड म्हणाले, माझे व मनोज जरांगे यांच्यात अनेकदा वाद झाले हे मला मान्य आहे. मराठा समाजाचा लढा 1981 पासून सुरू झाला. जरांगे यांनी लढा दिला. त्यामुळे माझ्या समाजाला आरक्षण मिळाले. त्याविषयी मी जरांगे यांचे आभार मानतो. मी त्यांना विनंती केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घ्या. मागील 70 वर्षांत कोणत्याही मराठा नेत्याने केले नाही, असे काम फडणवीस यांनी केले आहे. जरांगेंनी 30 मेपासून आंदोलन करू नये. सध्या उन्हाचे दिवस आहेत. मी आमदार व नेता म्हणून येथे आलो नाही. सामान्य समाजाचा माणूस म्हणून मी येथे आलो आहे.

मनोज जरांगेंनी मला 23 तारीख दिली. पण मी 22 तारखेलाच येथे आलो. तुम्ही निमंत्रण दिले. तुमचा मान म्हणून आलो. तुमच्या मनात असलेल्या द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही निर्णयांची ग्वाही दिली जाते. ते विषय सभागृहात नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून कसा मार्ग निघेल ते पाहू. मी तुमचा लहान भाऊ म्हणून येथे आलो आहे. मी त्यांच्या 7-8 मागण्या समजून घेणार आहे. त्यांचे विषय सरकार दरबारी मांडणार आहे. मी त्यांना वेळोवेळी भेटत राहील. मी सरपंचाच्या शेतातील ड्रॅगन फ्रुटही खायला येईल. एका मराठा समाजाचा व्यावसायिक आहे. त्याचा मला अभिमान आहे. मी राजकारणावर धंदा करत नाही, असे लाड म्हणाले.

लक्ष्मण हाकेंचा गैरसमज दूर करणार

प्रसाद लाड यांनी यावेळी लक्ष्मण हाके यांचाही गैरसमज दूर करण्याची ग्वाही दिली. लक्ष्मण हाके यांचा या प्रकरणी पोटशूळ उठण्याचे कारण नाही. मी त्यांचा गैरसमज दूर करेन. मनोज दादांचे अनेकदा मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. ते आजही थेट फोनवर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात. जरांगेंची भेट घेण्यापूर्वी मला धमकीचे फोन आले. असे फोन येतच असतात. काल काही लोकांनी मी राहत असलेल्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला आईवरून शिवीगाळ केली. माझ्या डोळ्यांत पाणी आले. शिव्या देणे सोपे असते. पण हृदयाला ठेच लागते. मला सांगा मी कुठू येऊ, मला मारा, असे लाड म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande