नाशिक - डिझेल टंचाईमुळे सोमवारपासून बाजार समितीमध्ये लिलाव बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
- कांदा भाजीपाला सह इतर मालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता लासलगाव / निफाड / चांदवड 22 मे (हिं.स.)। डिझेलची टंचाई असल्याकारणाने आता आशिया खंडातील कांद्याची सगळ्यात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी सोमव
Traders decide to stop


- कांदा भाजीपाला सह इतर मालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

लासलगाव / निफाड / चांदवड 22 मे (हिं.स.)।

डिझेलची टंचाई असल्याकारणाने आता आशिया खंडातील कांद्याची सगळ्यात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून कांद्या व धान्यांचे लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सोमवारपासून जोपर्यंत डिझेल उपलब्ध होत नाही तोपर्यंत अन्य राज्यांमध्ये कांदा व धान्य न पाठविण्याचे देखील निश्चित केले आहे त्यामुळे जिल्ह्यात शेतमालावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हेच धोरण जिल्ह्यातील अन्य बाजार समिती यांनी देखील घेण्याचे ठरविले असून त्याचा थेट परिणाम इतर भागांमध्ये जाणाऱ्या भाजीपालांवरती देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने मागील आठवड्यामध्ये दोन वेळा पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढविल्या त्यानंतर अचानक पणे डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे सातत्याने प्रशासनाकडून आणि राज्य सरकारकडून मुबलक डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे परंतु प्रत्यक्षात तसे दिसून येत नसल्याने ग्रामीण भागामध्ये विशिष्ट शेती काम करणाऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नाही त्यामुळे शेती वरती येतात थेट परिणाम होऊ लागलेला आहे तर दुसरीकडे भाजीपाला कांदा व धान्य हे बाजार समितीमध्ये लिलावासाठी अन्याय करता शेतकऱ्यांकडे डिझेल नसल्याने त्याचा देखील परिणाम हा होत आहे त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी देखील पुढील पावले उचलण्यास सुरुवात केल्याने सोमवारपासून मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. २५) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर आणखी घसरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच युद्धाच्या परिणामामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे, बांगलादेशमध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून कांदा जात नाही. उन्हामुळे कांदा खराब होत असून त्यामुळे दर घसरले आहेत. त्यात लिलाव बंद या संकटाची भर पडणार आहे.

लासलगाव बाजार समितीत सध्या रोज दहा ते पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यातील ९० टक्के कांदा हा वाहनातून इतर राज्यांत पाठवला जातो. त्यासाठी वाहने नसल्याने लिलाव बंद करण्यात येत आहेत.

चौकट

ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्याने सौदे तुटले

निफाड तालुक्यात उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. अशातच इंधन मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला कांदा इतर ठिकाणी पाठवण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नाहीत, तसेच घेतलेली ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्यामुळे अनेक सौदे तुटत आहेत.

- प्रवीण कदम, कांदा व्यापारी, लासलगाव

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande