
नवी दिल्ली , 22 मे (हिं.स.)। सन 2020 मधील दिल्ली दंगली प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिद याला तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 3 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जामीन मंजूर केला आहे. यासाठी एक लाख रुपयांचा वैयक्तिक जामीननामा सादर करावा लागणार आहे.
उमर खालिदला राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर)च राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याला घरीच राहावे लागेल आणि फक्त रुग्णालयात जाण्याची परवानगी असेल. यापूर्वीही न्यायालयाने कौटुंबिक कार्यक्रमांसाठी त्याला अंतरिम जामीन दिला होता आणि त्याने सर्व अटींचे पालन केले होते. न्यायालयाने उमर खालिदला या प्रकरणातील “मुख्य कटकारस्थानकर्त्यांपैकी एक” असे संबोधले. मात्र, त्याच्या आईची वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन मर्यादित अंतरिम दिलासा देण्यात आला.
सन 2020 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना दिल्लीच्या ईशान्य भागात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचार आणि जाळपोळीत 53 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) या निर्णयांविरोधात संतप्त नागरिकांनी आंदोलन केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात आंदोलनकर्त्यांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode