सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधांमुळे देशाच्या संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम - मनोज पांगरकर
लातूर, 23 मे (हिं.स.) - सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीवर भर देत अरुणाचल प्रदेशमध्ये विमानतळ निर्मिती तसेच तब्बल १९ हजार फूट उंचीवर रस्ते निर्माण करून देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यात आल्याचे प्रमुख वक्ते मनोज पांगरकर म्हणा
अभियान


लातूर, 23 मे (हिं.स.) - सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीवर भर देत अरुणाचल प्रदेशमध्ये विमानतळ निर्मिती तसेच तब्बल १९ हजार फूट उंचीवर रस्ते निर्माण करून देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यात आल्याचे प्रमुख वक्ते मनोज पांगरकर म्हणाले.

प्रथम दिवसातील पाचव्या सत्रात सत्राचे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देशासमोरील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई तळेगावकर, माजी खासदार सुधाकर शृंगार, भाजपा प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्गे यांच्यासह शेकडो प्रशिक्षणार्थी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते. लातूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, संयोजक व सहसंयोजक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रशिक्षण शिबिर यशस्वी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande