
नाशिक, 23 मे (हिं.स.)। - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणर आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाशिक मध्ये होणाऱ्या पुढील दौऱ्यात उद्घाटनाची वेळ देण्यात असल्याचे सांगितले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विद्यापीठाचे कुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आज शिर्डीत भेट घेतली . मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्याचे निमंत्रण विद्यापीठाद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी आगामी नाशिक दौऱ्यात लोकार्पणासाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ.राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंथळकर, ज्योत्स्ना एकबोटे, संगीता जगताप, प्रा. देविदास वायदंडे, नितीन घोरपडे, धोंडीराम पवार, संदीप पालवे आदीनी विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV