
लातूर, 23 मे (हिं.स.)। उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी 11 जून २०२6 रोजी लातूर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी नव उद्योजकांनी लातूर जिल्हा उद्योग केंद्र लातूर येथे आपल्या नव उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले आहे.
या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणे, नवउद्योजकांना आकर्षित करणे आणि गुंतवणूकदार-व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लातूर जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणे हा आहे. या परिषदेमध्ये नव उद्योजकांसोबत सामंजस्य करार होऊन त्यांना एमआययू वितरित केले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis