बारावीचे प्रमाणपत्र वाटप सोमवारपासून होणार सुरू
पुणे, 23 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बारावी परीक्षेचे एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सोमवार (ता.२५) रोजी वितरित करण्यात येणार आहे. संबंधित उच्च
बारावीचे प्रमाणपत्र वाटप सोमवारपासून होणार सुरू


पुणे, 23 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बारावी परीक्षेचे एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सोमवार (ता.२५) रोजी वितरित करण्यात येणार आहे. संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना हे दस्तऐवज दिले जाणार आहेत.राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल २ मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र तसेच तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख सोमवारी सकाळी ११ वाजता संबंधित विभागीय मंडळांकडून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना या कागदपत्रांचे वाटप होईल.यासंदर्भात सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande