
कोल्हापूर, 23 मे (हिं.स.)l मध्यंतरी पक्ष एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा थांबली. आता कोणाबरोबर ही चर्चा न करता शरद पवार पक्ष मोठा करणे यावर लक्ष केंद्रित केले असून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. मुंबईच्या बैठकीमध्ये विलीनीकरणावर पूर्णविराम देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विलीनीकरणामुळे आलेली मरगळ झटकून आता कामाला लागावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
विलीनीकरणाबाबत पत्रकरांशी बोलताना त्यांनी मागील गोष्टी खुल्या झाल्या तर ' बात दूर तक जायेगी' असे सुचक वक्तव्य केले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक राजर्षि शाहू सभागृह सर्किट हाऊस कोल्हापूर या ठिकाणी घेतली. दीड तास कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतल्यानंतर बोलत असताना ते म्हणाले कार्यकर्त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मध्यंतरी पक्ष एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा थांबली. आता कोणाबरोबर ही चर्चा न करता शरद पवार पक्ष मोठा करणे यावर लक्ष केंद्रित केले असून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. मुंबईच्या बैठकीमध्ये विलीनीकरणावर पूर्णविराम देण्यात आला आहे. त्यामुळे सरकार विरोधात छोटी मोठे आंदोलने करून पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विलीनीकरणामुळे आलेली मरगळ झटकून आता कामाला लागावे.
ते पुढे म्हणाले प्रत्येकाला त्याच्या कामाचे श्रेय दिले जाईल जे काम करणार नाहीत नुसते पदासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केले जाईल असेही सांगितले. जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये बी एल ओ यांची नियुक्ती करा. महाविकास आघाडी सन्मानाची वागणूक देईल याची दक्षता घेतली जाईल. पक्षाच्या वतीने सुद्धा आंदोलन केले जातील व महाविकास आघाडी म्हणून सुद्धा एकत्रित आंदोलन केली जातील त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून प्रचंड विरोध आहे नऊ तारखेच्या महामोर्चाला मी स्वतः कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहे असेही त्यांनी सांगितले शक्तिपीठाच्या शिष्टमंडळाबरोबर व्यापक चर्चाही केली यावेळी स्वागत शहर जनरल सेक्रेटरी गणेश जाधव यांनी केले कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी प्रास्ताविक केले व शहरातील व जिल्ह्यातील परिस्थिती संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना माहिती दिली यावेळी तालुका अध्यक्ष त्याचबरोबर काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या सर्व भूमिकेचा स्वीकार करून पुन्हा पक्ष बांधला जाईल असेही प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, रामराजे कुपेकर, जि. प. सदस्य अमर चव्हाण यांच्यासह शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने महिला, शहराध्यक्ष पद्मा तिवले, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, विनय कदम, संतोष मेघाणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar