सोलापूर - अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी 26 मे रोजी कार्यशाळा
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। महाडीबीटी पोर्टलवर सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी सोमवार दि.26 मे 2026 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशा
सोलापूर - अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी 26 मे रोजी कार्यशाळा


सोलापूर, 23 मे (हिं.स.)। महाडीबीटी पोर्टलवर सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी सोमवार दि.26 मे 2026 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.

सदर कार्यशाळेस संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असून संबंधितांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande