वारी कामांना आचारसंहितेतून सवलतीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच आषाढी वारीदरम्यान भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा सुरळीत ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले
Vithal


सोलापूर, 23 मे (हिं.स.)।

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच आषाढी वारीदरम्यान भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा सुरळीत ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. यंदाच्या आषाढी वारीतही व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आषाढी वारी नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. आषाढी वारी २०२६ दरम्यान पालखी मार्ग, विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी विविध सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी आवश्यक कामांची यादी २३ मेपर्यंत प्रशासनाकडे सादर करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वारीसंदर्भातील कामांना सवलत मिळावी यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ)ने यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून ५४०० बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. सर्व बसगाड्यांची तांत्रिक तपासणी करून त्या रस्त्यात बंद पडणार नाहीत याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंढरपूर शहरात तात्पुरते बसस्थानक उभारून मोबाईल टॉयलेट आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande