सोलापूर - थकीत ऊस बिलासाठी मोहोळ तहसीलसमोर बेमुदत आंदोलन सुरू
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल अद्याप न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात
सोलापूर - थकीत ऊस बिलासाठी मोहोळ तहसीलसमोर बेमुदत आंदोलन सुरू


सोलापूर, 23 मे (हिं.स.)। मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल अद्याप न दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली.शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्याने ऊसदरापोटी केवळ ५० टक्के रक्कम, म्हणजेच प्रतिटन १,५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र उर्वरित ५० टक्के रक्कम प्रतिटन ३,००० रुपये आणि त्यावर १५ टक्के व्याज देणे नियमानुसार बंधनकारक असतानाही कारखाना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.थकीतऊसबिलांमुळेशेतकरी आर्थिक संकटातसापडलेअसून अनेक कुटुंबांमध्ये लग्नसमारंभ, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी, तसेच खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी, शेती मशागत आणि पेरणीसाठी पैशांची मोठी गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले.याबाबत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित साखर कारखान्याला शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा करण्यास भाग पाडावे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला.या आंदोलनात बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार, अभिमान गायकवाड, संभाजी माळी, सिद्राम वाघमोडे, नागेश बारबोले, शुभम तळेकर, पृथ्वीराज भोसले, उमेश माने, अनिल वसेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande