उधना–भुसावळ मार्गावर नवीन दोन विशेष गाड्या धावणार
जळगाव , 23 मे (हिं.स.) खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्ष्यत घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मधुबनी आणि उधना–झांझरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
उधना–भुसावळ मार्गावर नवीन दोन विशेष गाड्या धावणार


जळगाव , 23 मे (हिं.स.) खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्ष्यत घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मधुबनी आणि उधना–झांझरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमुळे खान्देश (विशेषतः जळगाव, भुसावळ, नंदुरबार) आणि गुजरातमधील हजारो प्रवाशांचा उन्हाळ्यातील प्रवास सुखकर होणार आहे.पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०४५ उधना–मधुबनी विशेष गाडी २४ मे आणि ३१ मे रोजी चालविण्यात येणार आहे. ही गाडी उधना स्थानकावरून सकाळी १.३० वाजता सुटेल. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी दुपारी ०४.१५ वाजता मधुबनी येथे पोहचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०९०४६ मधुबनी–उधना विशेष गाडी २५ मे आणि ०१ जून रोजी मधुबनी स्थानकावरून सायंकाळी ०६.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०१.१५ वाजता उधना स्थानकावर दाखल होईल. याचबरोबर गाडी क्रमांक ०९०४७ उधना–झांझरपूर विशेष गाडी २५ मे आणि ०१ जून रोजी उधना येथून रात्री १०.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ०१.४५ वाजता झांझरपूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०९०४८ झांझरपूर–उधना विशेष गाडी २५ मे २०२६ आणि ०१ जून रोजी झांझरपूर येथून रात्री १०.३० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०१.४५ वाजता उधना येथे पोहचेल. या विशेष गाड्यांना मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजिपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा आणि साक्री आदी स्थानकांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande