नांदेडमध्ये १२ गुन्हे उघड, ४ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, 24 मे (हिं.स.) नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत चोरीचे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन मोटारसायकली व दहा मोबाईल असा एकूण अंदाजे ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप
नांदेडमध्ये १२ गुन्हे उघड, ४ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त


नांदेड, 24 मे (हिं.स.) नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत चोरीचे तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन मोटारसायकली व दहा मोबाईल असा एकूण अंदाजे ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, नांदेड ग्रामीण हद्दीतील गाडेगाव रोड परिसरात काही संशयित व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्रीसाठी थांबल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande