अमरावती - जिल्ह्यात उष्माघाताचे आजवर १५ रुग्ण
अमरावती, 24 मे (हिं.स.)।एप्रिलपासूनच सर्वत्र सूर्य आग ओकायला लागला. मे महिनाही आता संपत येत आहे. जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहताहेत. जिल्ह्यात उष्माघात सदृश्य १५ रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली, अश
जिल्ह्यात उष्माघाताचे आजवर १५ रुग्ण


अमरावती, 24 मे (हिं.स.)।एप्रिलपासूनच सर्वत्र सूर्य आग ओकायला लागला. मे महिनाही आता संपत येत आहे. जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहताहेत. जिल्ह्यात उष्माघात सदृश्य १५ रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) प्रशासनाने दिली.

सूर्य आग ओकत असल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने जिल्ह्यात तालुकानिहाय उष्माघात कक्ष स्थापन केले आहेत. तापमानातील अपेक्षित वाढ पाहता उष्माघाताबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून शहरासह ग्रामीण भागातही तिचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. आवश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळले जात आहे. मागील संपूर्ण एप्रिल महिना उष्णतेचा गेला. विक्रमी ४७ अंशाच्याही वर कमाल तापमानाची नोंद झाली आहे. या कालावधीत सुरुवातीला उष्माघाताचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. त्यानंतर रुग्णांमध्ये वाढ झाली. सध्या मे महिना सुरू आहे. यामहिन्यात आणखी तापमानात वाढ झाली आहे. दिवसा तसेच रात्रीचे तापमानही लक्षणीयरित्या वाढले आहे. यामुळे नागरिकांना विविध आरय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी उष्माघा सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे समोर येत आहे.दरम्यान, काही दिवसांपासून जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअ र्यंत नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुमारे १५ रुग्ण उष्माघात सदृश्य लक्षणांमुळे शासकीय उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचे व कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे. चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे किंवा घाम बंद होणे, अशी उष्माघाताची लक्षणे असून, अशी लक्षणे दिसल्यास रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande