
परभणी, 24 मे (हिं.स.)।
काही दिवसांपूर्वी खडका सबस्टेशन 33 केव्ही येथे 5 एमव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मिळावा यासाठी मागणी करण्यात आली होती.
सततच्या पाठपुराव्याला यश मिळत असून खडका सबस्टेशन येथे नवीन 5 एमव्हीचा ट्रान्सफॉर्मर दाखल झाला आहे. अशी माहिती पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे
या ट्रान्सफॉर्मरमुळे जवळपास 10 ते 15 गावांतील नागरिकांचा लोडशेडिंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी केलेला प्रत्येक पाठपुरावा हा लोकहितासाठीच असतो…
आपल्या सर्वांच्या सहकार्याने विकासाची ही वाट पुढेही अशीच सुरू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis