टीसीएस प्रकरण : एमआयएम नगरसेवकाला सोमवारी नाशिकला चौकशीसाठी बोलावले
पैसे उकळल्या प्रकरणी दानेशच बँक खाते सील नाशिक, 24 मे (हिं.स.)। टीसीएस प्रकरणांमध्ये आता पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया केल्या असून त्यामध्ये आरोपी दानेश शेख याचे खाते सिल केले आहे. तर दुसरी कारवाई मदत करणारा एमआयएमच्या नगरसेवकाला चौकशीसाठी सोमवारी
टीसीएस प्रकरण : एमआयएम नगरसेवकाला सोमवारी नाशिकला चौकशीसाठी बोलावले


पैसे उकळल्या प्रकरणी दानेशच बँक खाते सील

नाशिक, 24 मे (हिं.स.)। टीसीएस प्रकरणांमध्ये आता पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया केल्या असून त्यामध्ये आरोपी दानेश शेख याचे खाते सिल केले आहे. तर दुसरी कारवाई मदत करणारा एमआयएमच्या नगरसेवकाला चौकशीसाठी सोमवारी नाशिकमध्ये बोलवले आहे. त्यामुळे सोमवारच्या चौकशीत अजून काय समोर येतं त्यावर पुढील कारवाई एसआयटी मार्फत केली जाणार आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी नाशिकच्या टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस या इंदिरानगर जवळ असलेल्या कंपनीमध्ये हिंदू महिलांचे लैंगिक शोषण आणि धार्मिकीकरण केले जात असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे पोलीस आयुक्तांनी पोलिसांचे एक पथक या कंपनीमध्ये पाठवले होते त्या ठिकाणी गेलेल्या पथकाकडून प्रत्यक्ष तपास करण्यात आला त्यातील काही माहिती गोळा करण्यात आली यानंतर पहिल्या गुन्हा हा नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला तर अन्य नऊ गुन्हे हे मुंबई नाका पोलीस ठाण्यातमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना केली होती. या एसआयटी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरू होता.

नुकतेच या एसआयटी पथकाने पहिलं गुन्हे आरोप पत्र हे न्यायालयामध्ये सादर केलेला आहे. यादरम्यान एकूण आठ आरोपींची चौकशी करण्यात आली. या आरोपींमध्ये असलेला दानेश शेख येणे लैंगिक छळ आणि धर्मांतर करत असताना एका महिलेकडून पैसे उकळण्याची घटना देखील समोर आली आहे. एसटीच्या तपास पथकाने ही घटना समोर आल्यानंतर सविस्तर तपास सुरू करण्यासाठी सर्वप्रथम दानेश याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर आतापर्यंत किती रक्कम खंडणी स्वरूपात वसूल करण्यात आली आहे. याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान पहिला गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये या कंपनीत काम करणारी निदा खान ला पोलिसांनी तब्बल 40 दिवसाच्या पेक्षा अधिक कालावधीनंतर अटक करण्यात आली निदा सातत्याने पोलिसांना चकमा देत होती. यादरम्यान तिला मदत करणारा छत्रपती संभाजी महाराज नगर येथील एमआयएमचा नगरसेवक मतिन खान याला आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मतिनच्या घरातून निदा खान ला अटक करण्यात आली होती ही कारवाई देखील छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी यांनी अतिशय सीताफिने केली होती. सध्या निदा खान ही नाशिकच्या न्यायालयामध्ये न्यायालयीन कोठारी मध्ये आहे. तर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हणून आता आज सोमवारी मतीन याला पोलिसांनी हजर राहण्याची नोटीस दिलेली आहे. सोमवारी तो हजर झाल्यानंतर अजून काही नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande